पाक म्हणतोय, भारताने आत्मपरीक्षण करावे

वृत्तसंस्था
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

कराचीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कोणताही विचार न करता पाकिस्तानवर आरोप केले आहे. भारताच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयशाचे खापर आमच्यावर माथ्यावर फोडण्याची भारताची ही चाल आहे. भारताने आत्मपरीक्षण करावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. भारताने आत्मपरीक्षण करुन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणातील त्रुटींबद्दल उत्तर द्यावे. आदिल अहमद दारचा कबुलीचा व्हिडिओ भारताने लगेच स्वीकारला पण कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ भारत मान्य करत नाही, अशी टीका मोहोम्मद फैझल यांनी केली.

पुलवामा येथील हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने रचलेलं षडयंत्र आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉ ने हल्ला, असे पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानकडून ही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. भारतात काश्मिरी विद्यार्थ्यांवर विविध ठिकाणी हल्ले होत असून, पोलिस काश्मिरी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack : india must introspect lapses caused pulwama attack says pakistan