कामगार कायद्यांसाठी चीनवर दबाव आणावा - बायडेन

जगातील सर्वांत श्रीमंत सात देशांची संघटना असलेला ‘जी-७’ गटाच्या परिषदेसाठी सदस्य देशांच्या नेत्यांचे ब्रिटनमधील कॅरबिस बे येथे आगमन झाले आहे.
Joe Biden
Joe BidenSakal

लंडन - चीनने (Chin) कामगार कायदांची (Labour Law) अमलबजावणी करावी, यासाठी सर्वांनी सार्वजनिक पातळीवर चीनवर दबाव (Pressure) आणावा, असे आवाहन अमेरिका ‘जी-७’ परिषदेत (G-7 Conferance) करणार असल्याचे शनिवारी सांगण्यात आले. (Put Pressure on China for Labor Laws Biden)

जगातील सर्वांत श्रीमंत सात देशांची संघटना असलेला ‘जी-७’ गटाच्या परिषदेसाठी सदस्य देशांच्या नेत्यांचे ब्रिटनमधील कॅरबिस बे येथे आगमन झाले आहे. आगामी दशकात आर्थिक स्तरावर चीनशी स्पर्धा करण्यासाठी लोकशाहीवादी नेत्यांना संयुक्त व्यासपीठावर आणण्यासाठी बायडेन यांचा प्रस्ताव असून कामगार हित हा याचाच एक भाग असल्याचे दोन वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

Joe Biden
अल्ट्रामॅरेथॉनमध्ये 21 धावपटूंचा मृत्यू; 27 अधिकाऱ्यांना चीन देणार शिक्षा

चीनमध्ये उईगर मुस्लीम व अन्य व पारंपरिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून तेथे कामगार कायदा राबविण्यास चीनला भाग पाडण्यासाठी ‘जी-७’ नेत्यांनी एकत्र आवाज उठवावा. या परिषदेच्या सांगतेच्यावेळी प्रसिद्ध होणाऱ्या संयुक्त जाहीरनाम्यात या संदर्भात चीनविरोधात एकत्र भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा बायडेन यांना वाटत आहे. मात्र चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास काही युरोपिय नेत्यांची तयारी नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com