अमेरिका-रशिया संबंध बिघडू नयेत- पुतीन

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रशियाकडून हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांची विशेष तपास अधिकारी रॉबर्ट म्युलर हे चौकशी करत आहेत. मात्र, हा प्रकार अंतर्गत राजकारणातून सुरू असून, त्यात आम्हाला रस नाही,'' असे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज व्यक्त केले. 

वॉशिंग्टन - "अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रशियाकडून हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांची विशेष तपास अधिकारी रॉबर्ट म्युलर हे चौकशी करत आहेत. मात्र, हा प्रकार अंतर्गत राजकारणातून सुरू असून, त्यात आम्हाला रस नाही,'' असे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज व्यक्त केले. 

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुतीन यांनी हे मत मांडले. पुतीन या वेळी म्हणाले की, म्युलर हे चौकशी करत असले तरी हा अमेरिकेचा अंतर्गत मुद्दा आहे. यात मला काडीचाही रस नाही. या प्रकरणामुळे अमेरिका-रशिया संबंध बिघडू नयेत, असे मला वाटते. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यात सोमवारी फिनलंडमधील हेलसिंकी येथे शिखर परिषद झाली. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी वरील वक्तव्य केले आहे. 

Web Title: putin statement on america russia relation