
ट्रम्प यांना चिंता नाही
व्हाइट हाउसमधील आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली तरी संसर्ग पसरण्याची चिंता वाटत नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अधिकार्यांनी मात्र तेथील सुरक्षेचे उपाय आणखी कडक करण्यात येतील.
वॉशिंग्टन - जगातील सर्वांत बलाढ्य देशातील सर्वाधिक सुरक्षित इमारत कोरोनापासून बचावू शकत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. व्हाइट हाउसच्या कोरोना कार्य दलाच्या (टास्क फोर्स) तीन महत्त्वाच्या सदस्यांना क्वारंटाइन करावे लागले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फाऊची, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांचा यात समावेश आहे.
पाकिस्तानात गोड गोड बोलून पुरुषांना फसवतात महिला
हे तिेघे ज्याच्या संपर्कात आले ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे हे घडले आहे. फाऊची यांची चाचणी निगेटीव्ह आली असून त्यांना तुलनेने कमी धोका आहे. त्यांची नियमित चाचणी होईल. ते इतरांच्या संपर्कात येण्याचा धोका कमी करतील आणि योग्य खबरदारी घेतील. ते घरीच थांबतील आणि ऑनलाइन तसेच फोनच्या मदतीने काम करतील. गरज पडल्यास ते व्हाइट हाऊसमध्ये जातील आणि तेव्हा प्रत्येक प्रकारची खबरदारी घेतील. रेडफील्ड हे सुद्धा अशाच पद्धतीने काम करतील. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण
हान यांची चाचणी निगेटिव्ह आली. या तिघांना सिनेटच्या एका समितीसमोर मंगळवारी आपली बाजू मांडायची आहे. आता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे घडेल. उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या प्रसिद्धी सचिव शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या. ही व्यक्ती म्हणजे प्रवक्त्या केटी मीलर असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले. ट्रम्प यांचे सल्लागार स्टीफन यांची ती पत्नी आहे. आदल्या दिवशी त्यांची चाचणी निगेटीव्ह आली होती. त्या पेन्स यांच्या संपर्कात होत्या, पण ट्रम्प यांच्याशी त्यांचा संपर्क नव्हता.