Queen Elizabeth Death: उद्या होणार राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Queen Elizabeth Death: उद्या होणार राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर अंत्यसंस्कार

Queen Elizabeth Death: उद्या होणार राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर अंत्यसंस्कार

Queen Elizabeth ii Funeral सोमवारी सकाळी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराचे प्रसारण करण्यासाठी यूकेच्या विविध उद्यानांमध्ये भव्य स्क्रीन्स लावण्यात येतील. यासोबतच अनेक चित्रपटगृहेही या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाची तयारी करत आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले असून सोमवारी सकाळी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

ब्रिटनमध्ये गेल्या 57 वर्षांतील पहिला शासकीय अंत्यसंस्कार प्रोटोकॉल आणि लष्करी परंपरेनुसार होणार आहे, ज्यासाठी अनेक दिवसांपासून सराव सुरू आहे. यूकेमध्ये सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रीय स्तरावर दिवंगत राणीचा आदर व्यक्त करण्यासाठी रविवारी रात्री 8 वाजता सामान्य लोकांसोबतच सर्व संस्थांना देखील मौन पाळण्यास सांगितले जात आहे. लंडनचा हायड पार्क, शेफिल्डचा कॅथेड्रल स्क्वेअर, बर्मिंगहॅमचा सेन्टेनरी स्क्वेअर, कार्लिस्लेचा बाइट्स पार्क, एडिनबर्गचा होलीरूड पार्क आणि नॉर्दर्न आयर्लंडमधील कोलेरेन टाऊन हॉलसह देशभरात भव्य स्क्रीन बसवल्या जातील अशी माहिती ब्रिटनच्या डिसीएमएस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: राहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत, भारत जोडो यात्रेचा Video Viral

संपूर्ण यूकेमधील चित्रपटगृहे अंत्यसंस्काराचे कार्यक्रम दाखवण्यासाठी तयारी करत आहेत. राणीच्या शासकीय अंत्यसंस्काराच्या आधी सकाळी 6:30 वाजता वेस्टमिन्स्टर हॉल सर्वसामान्यांसाठी बंद केला जाईल. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी संध्याकाळी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर पोहोचल्या आहेत.

दुपारी 12.15 वाजता सार्वजनिक मिरवणूक सुरू होईल आणि राणीची शवपेटी वेस्टमिन्स्टर अॅबे ते लंडनमधील वेलिंग्टन आर्कपर्यंत नेली जाईल आणि तिथून तिचा विंडसरचा प्रवास सुरू होईल. सोमवारी संध्याकाळी एका खाजगी शाही समारंभात किंग जॉर्ज सहावा मेमोरियल चॅपल येथे दिवंगत पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थीव दफन केले जाईल.

हेही वाचा: भारतात लॉंच झाले १० तास बॅटरी लाइफ देणारे इअरबड्स; किंमतही बजेटमध्ये

राणीच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातील राजघराण्यातील सदस्यांसह सुमारे 500 जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी वेस्टमिन्स्टरच्या पॅलेसमधील वेस्टमिन्स्टर हॉलपासून वेस्टमिन्स्टर अॅबीपर्यंत मिरवणुकीत नेली जाईल, जिथे अंत्यसंस्कार सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि सुमारे एक तासानंतर दोन मिनिटांच्या राष्ट्रीय मौनाने समाप्त होतील.

Web Title: Queen Elizabeth Ii Funeral Program Will Be Live Broadcast In Cinemas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..