राणी एलिझाबेथ कमी करणार जबाबदारी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

लंडन - इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ या आगामी महिनाभरात विविध राष्ट्रीय संघटनांच्या आश्रयदाता म्हणून असलेली जबाबदारी कमी करणार आहेत. बंकिंगहॅम पॅलेसच्या वतीने नुकतेच एक पत्रक जारी करण्यात आले असून, त्याद्वारे ही माहिती देण्यात आली.

एलिझाबेथ यांनी एप्रिल महिन्यात वयाची 90 वर्ष पूर्ण केली असून, त्या इंग्लंडमधील ""एनएसपीसीसी'' या बालहक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेसह शेकडो धर्मादाय ट्रस्टच्या आश्रयदात्या आहेत. लॉन टेनिस असोसिएशन, रग्बी फुटबॉल युनियन अशा क्रीडा क्षेत्रातील अन्य संघटनांनाही त्या मदत करतात. मात्र, आता त्यांनी ही जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ती परिवारातील अन्य सदस्याकडे सोपविली जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.

एलिझाबेथ या जगातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या राणी आहेत. त्यांचे पती राजे फिलीप यांनीही मध्यंतरी अशा प्रकारची जबाबदारी कमी केली होती.

Web Title: queen elizabeth to reduce workload