राणी एलिझाबेथ द्वितीय यांची सफायर ज्युबिली

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

लंडन  : ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (65 वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मिळाला आहे. इतक्‍या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा आणि राणीचा मुकुट मिरविण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत.

लंडन  : ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (65 वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मिळाला आहे. इतक्‍या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा आणि राणीचा मुकुट मिरविण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत.

नोरफोल्क येथील सॅण्ड्रिगहॅम इस्टेट या त्यांच्या निवासस्थानी खासगीरीत्या सफायर ज्युबिलीचा कार्यक्रम साजरा झाला. याचे औचित्य साधून बकिंगहॅम पॅलेसतर्फे राणींचे नीलम या मौल्यवान खड्यांचे दागिने घातलेले छायाचित्र पुन्हा जारी करण्यात आले. 2014 मध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड बेली यांनी हे छायाचित्र काढले होते. त्या वेळी ब्रिटनला जगभरात नेण्यासाठी राबविलेल्या एका मोहिमेसाठी हे छायाचित्र काढण्यात आले होते. या चित्रात राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी घातलेला हा नीलम खड्यांचा निळ्या रंगांचा हार त्यांचे पती किंग जॉर्ज सहावे यांनी 1947 मध्ये त्यांना लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिला होता.
याच दिवशी 6 फेब्रुवारी 1952 ला राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील पंचम जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता. आज झालेल्या विशेष कार्यक्रमात ग्रीन पार्क येथे अश्‍व तोफखाना विभागाने 41 तोफांची सलामी दिली, तर तोफखाना विभागाने 62 तोफांची सलामी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी निळ्या रंगाचे पाच पौंडच्या टपाल तिकिटाचेही अनावरण करण्यात आले.

राणींची कारकीर्द
जन्म : 21 एप्रिल 1926
जन्म स्थळ : लंडन
पूर्ण नाव : एलिझाबेथ ऍलेक्‍झांडर मेरी
सत्ता कालावधी : 6 फेब्रुवारी 1952 ते आजपर्यंत
राज्याभिषेक : 2 जून 1953

सम्राज्ञीपद
सत्तेच्या सिंहासनावर सर्वाधिक काळासाठी असलेल्या त्या सद्यःस्थितीच्या एकमेव व्यक्ती आहेत. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचेही सम्राज्ञीपद त्यांच्याकडे आहे. याशिवाय त्यांच्या काळात तब्बल 12 देश स्वतंत्र झाले यामध्ये जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनाडा, पपुआ न्यू जीनिवा, सोलोमन आईसलॅण्ड, तुवालू, सेंट लुसिआ, सेंट व्हिनसेंट ऍण्ड द ग्रेनडिन्स, बीलिझ, ऍण्टिग्वा ऍण्ड बार्बुडा आणि सेंट किट्‌स ऍण्ड नेव्हिस या देशांचा समावेश आहे. या देशांच्याही सम्राज्ञीपदाचा मान यांच्याचकडे आहे.

Web Title: queen elizabeth second's saffire jubilee