राणीला मारली असती सुरक्षारक्षकाने गोळी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

रात्री झोप न आल्याने राजमहालाच्या आवारातील बगिचामध्ये राणी एलिझाबेथ फेरफटका मारत होत्या. आपण बागेत असल्याबद्दल त्यांनी कोणालाही सूचना दिली नव्हती. या वेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका रक्षकाने दुरून त्यांना पाहिले. मात्र, कोणीतरी घुसखोरी केली असावी, असे समजून त्याने गोळी झाडण्यासाठी बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवले

लंडन - ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर त्यांच्याच एका सुरक्षारक्षकाने चुकून गोळी झाडली असती, असे येथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेवर ब्रिटनच्या राजघराण्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

रात्री झोप न आल्याने राजमहालाच्या आवारातील बगिचामध्ये राणी एलिझाबेथ फेरफटका मारत होत्या. आपण बागेत असल्याबद्दल त्यांनी कोणालाही सूचना दिली नव्हती. या वेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका रक्षकाने दुरून त्यांना पाहिले. मात्र, कोणीतरी घुसखोरी केली असावी, असे समजून त्याने गोळी झाडण्यासाठी बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवले. ट्रिगर ओढणार एवढ्यात ती व्यक्ती म्हणजे खुद्द राणी असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बंदूक खाली घेतली.

त्याने याबद्दल राणीला तत्काळ सांगितले. राणीने मात्र, "ठिक आहे, पुढील वेळी मी रात्री बाहेर पडायच्या आधी सांगत जाईल, म्हणजे माझ्यावर तुला गोळी झाडावी लागणार नाही,' असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला.

Web Title: Queen Elizabeth would have been shot at

टॅग्स