महिलांवर बलात्कार, बालकांचं लैंगिक शोषण; प्रसिद्ध गायक ३० वर्षांसाठी गजाआड |US pop singer R Kelly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

US pop singer R Kelly

महिलांवर बलात्कार, बालकांचं लैंगिक शोषण; प्रसिद्ध गायक ३० वर्षांसाठी गजाआड

महिला आणि मुलांच्या यौन शोषणाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले अमेरिकी पॉप गायक आर कॅली यांना अखेर नऊ महिन्यानंतर बुधवारी शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना ३० वर्षांची कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली. (US pop singer R Kelly)

आर कॅली यांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयार्कच्या कोर्टात आठ महिलांची तस्करी करण्यासंदर्भात दोषी ठरवले होते. त्यानंतर या कारवाईवरुन बराच वाद रंगला. 55 वर्षीय गायक रॉबर्ट सिल्वेस्टर कॅलीला रॅकेटियरिंग तोडण्याविरोधात आठ आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. 45 साक्षीदारांनी या संदर्भात सरकारला दुजोरा दिला होता. जूलै 2019 पासून ते कारागृहात आहे. (R Kelly sentenced to 30 years imprisonment as he found guilty of sex trafficking and racketeering)

हेही वाचा: युक्रेनच्या मदतीला बकरी आली धावून; रशियाचे ४० सैनिक गंभीर जखमी

आर कॅलीला जन्मठेप व्हावी अशी मागणी कित्येक दिवसांपासून सुरू होती. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला आणि मुलांवर त्याने कोणतीही दयामाया दाखवली नाही. दोन दशके त्यांना त्रास दिला.

इलिनॉय आणि मिनेसोटा येथील राज्य न्यायालयातील आरोपांव्यतिरिक्त, त्याला अजूनही बाल पोर्नोग्राफी आणि शिकागोमध्ये न्यायात अडथळा आणल्याच्या आरोपांचाही सामना करावा लागला.

हेही वाचा: Raja Krishnamurthy : भारतीय वंशाच्या खासदारानं इलिनॉयमधून मिळवला मोठा विजय

1990 आणि 2000 च्या सुरवातीलाही सर्वात यशस्वी हिटमेकर्समधील एक असलेल्या कॅलीला सप्टेंबरमध्ये त्याला या काही प्रकरणात दोषी ठरविण्यात आले.

कॅलीने 1994 मध्ये गायिका आलियाशी लग्न केले होते, तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती,मात्र प्रमाणपत्रात तिचे वय १८ वर्षे असल्याचे दाखवले गेले होते. नंतर त्यांचे लग्नाला मान्यता मिळाली नाही त्यानंतर नऊ वर्षांनंतर आलियाचा विमान अपघातात मृत्यू झाला.

Web Title: R Kelly Sentenced To 30 Years Imprisonment As He Found Guilty Of Sex Trafficking And Racketeering

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..