वंशद्वेष, भेदभावामुळे लोकशाहीला धोका- ओबामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

शिकागो : वंशद्वेष, विषमता आणि भेदभाव आदींमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचा इशारा अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या अखेरच्या भाषणात अमेरिकी जनतेला दिला. "यस वुई कॅन' असे म्हणत आठ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या ओबामा यांनी आपल्या अखेरच्या भाषणाचा शेवटही "यस वुई कॅन, यस वुई डिड' या वचनाने केला.

शिकागो : वंशद्वेष, विषमता आणि भेदभाव आदींमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचा इशारा अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या अखेरच्या भाषणात अमेरिकी जनतेला दिला. "यस वुई कॅन' असे म्हणत आठ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या ओबामा यांनी आपल्या अखेरच्या भाषणाचा शेवटही "यस वुई कॅन, यस वुई डिड' या वचनाने केला.

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार असून, त्याच दिवशी ओबामा यांच्या कारकिर्दीची अखेर होत आहे. शिकागोतील अखेरच्या भाषणावेळी अतिशय भावनाप्रधान झालेले "मिस्टर प्रेसिडेंट' उपस्थित असलेल्या 20 हजार जणांनी अनुभवले. 2008मध्ये माझी अध्यक्षपदी निवड झाली होती, त्या वेळी वंशद्वेषविरहित अमेरिकीची संकल्पना अनेकांनी मांडली होती. मात्र, ही संकल्पना अद्यापही वास्तवात आलेली नाही, याची जाणीव ओबामा यांनी करून दिली.
अमेरिकेतील मुस्लिमांबाबत भेदभावाचे धोरण आपल्याला अमान्य असल्याचे मत 50 वर्षी ओबामा यांनी मांडले. आपल्या भाषणात ट्रम्प यांचा कोठेही उल्लेख न करता त्यांच्या अनेक धोरणांचे ओबामा यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले. नागरिकांना जेव्हा जेव्हा गृहीत धरले जाते त्या वेळी लोकशाहीला धोका निर्माण होतो, याची आठवण करून देत अमेरिकी नागरिकांनी आपली मूल्ये जपावीत, असा सल्ला मावळत्या अध्यक्षांनी जनतेला दिला.

ओबामा झाले भावुक
ओबामा म्हणाले, ""मी आणि मिशेलने अनेक वेळा तुमच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. पण, आता तुम्हाला धन्यवाद म्हणण्याची वेळ आली आहे. मलिया आणि साशा या दोघींनाही माझ्या आयुष्यात खूप महत्त्व असून, मी त्यांचा पिता असल्याचा मला अभिमान आहे. मिशेल केवळ पत्नी किंवा माझ्या मुलांची आईच नाही, तर माझी सर्वांत चांगली मैत्रीणही आहे.'' पत्नी आणि मुलींबाबत बोलताना भावुक झालेल्या ओबामांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

"आम्हा सर्वांना माफ करा!'
अखेरच्या भाषणात अमेरिकन नागरिकांचे आभार मानत, अमेरिकेचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे ओबामा म्हटले. तुम्ही सर्वांनी मिळून मला एक सर्वोत्तम अध्यक्ष आणि सर्वोत्तम व्यक्ती बनविले, असे ते म्हणाले. या वेळी एका महिलेने झळकाविलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलेच्या हातातील फलकावर "आम्हा सर्वांना माफ करा!' असे लिहिले होते. नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: racism a threat to democracy, say obama