जहालमतवादी हे दहशतवादी नाहीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

इस्लामाबाद /नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली दुटप्पी भूमिका जाहीर केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री चौधरी निसार यांनी जहालमतवादी दहशतवादी नसल्याचे वक्तव्य करत दहशतवादामध्ये फरक करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या आणि वाईट दहशतवादामध्ये फरक केल्यानंतर पाकिस्तान सरकारला चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आणि बंदी घातलेल्या कट्टरपंथीय संघटनांमध्ये फरक केला गेला पाहिजे, असे सांगून चौधरी निसार यांनी म्हटले होते की, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविषयी कोणीही कोणताही संशय घेऊ नये, तर जहालमतवादी धार्मिक संघटनांकडे दहशतवादी संघटनांप्रमाणे पाहू नये.

निसार यांनी अतिशय विचारपूर्वक हे वक्तव्य केले आहे. कारण, त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही प्रकारच्या संघटनांसाठी देशात वेगवेगळ्या प्रकारचा कायदा असला पाहिजे. राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीचा उल्लेख करून ते म्हणाले की, जहालमतवादी धार्मिक संघटना आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील फरकाविषयीच्या माझ्या वक्तव्याला आक्षेप घेणाऱ्यांनी ही यादी पाहिली पाहिजे. या यादीत समाविष्ट दोन शिया नेत्यांच्या नावांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, अल्लामा साजिद नकवी यांना एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडले जाऊ शकते का? सैद हामिद अली शाह मुसावी यांना एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडले जाऊ शकते का? अजिबात नाही, कारण हे सर्व देशभक्‍त पाकिस्तानी आहेत.

निसार यांच्यावर टीकास्त्र
निसार यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पाकिस्तान पीपल्स पक्षाने त्यांना दहशतवाद्यांचे प्रवक्ते असे म्हटले आहे. त्याच वेळी एमक्‍यूएम या आणखी एका विरोधी पक्षाचे खासदार ताहिर हुसैन यांनी म्हटले आहे की, देशात तालिबानसारखे जहालमतवादी धार्मिक गट दहशतवादी संघटनांपेक्षा अधिक धोकादायक असल्यामुळे अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचे वक्तव्य आश्‍चर्यजनक आहे.

Web Title: radicalist are not terrorist, says pakistan