Asian Games 2018 : महाराष्ट्राच्या राहीने पटकावले आशियाई स्पर्धेत सुवर्ण

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावणारी मनू भाकर हिला मात्र सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जकार्ता : आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम राहिले आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतने सुर्वण पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी 2014च्या आशियाई स्पर्धेत तिने ब्राँझ पदक कमावले होते. 

सुरवातीपासूनत सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले पहिले स्थान कायम ठेवले होते. मात्र, शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या नफास्वान यांगपायबून यांच्यात शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोघींचे 4 - 4 गुण झाल्यामुळे दुसरा शूटऑफ सामना खेळवण्यात आला. या शूटऑफमध्ये राहीने 3 - 2 ने बाजी मारत सुवर्णपदक आपले नाव कोरले तर कोरियाची मिनजुंग किम हि ब्रॉंझ पदकाची मानकरी ठरली.   

पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावणारी मनू भाकर हिला मात्र सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahi sarnobat wins gold in asian games