
पौडेल यांना संसदेच्या 214 आणि प्रांतीय असेंब्लीच्या 352 सदस्यांनी पाठिंबा दिला.
Nepal President : नेपाळची धुरा आता 'रामा'च्या हाती; पौडेल यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ
रामचंद्र पौडेल (Ram Chandra Paudel) यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात नेपाळचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीये. राष्ट्रपती भवनात नेपाळचे कार्यवाहक सरन्यायाधीश यांनी त्यांना शपथ दिली.
पौडेल यांचा सामना सीपीएन-यूएमएलचे सुभाषचंद्र नेमवांग यांच्याशी होता. या निवडणुकीत रामचंद्र पौडेल यांना 33,802 मतं मिळाली. आयोगानं सांगितलं की, नेपाळी संसदेत झालेल्या निवडणुकीत फेडरल संसदेच्या 313 सदस्यांनी भाग घेतला.
नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढत असताना आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कमकुवत होत असताना पौडेल हे राष्ट्रपती झाले आहेत. पौडेल हे आठ पक्षांच्या युतीचं संयुक्त उमेदवार होते. यामध्ये नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ- माओईस्ट सेंटर (CPN- Maoist Centre) यांचा समावेश आहे.
पौडेल यांना संसदेच्या 214 आणि प्रांतीय असेंब्लीच्या 352 सदस्यांनी पाठिंबा दिला. 2008 मध्ये देशाला प्रजासत्ताक घोषित केल्यानंतर ही तिसरी अध्यक्षीय निवडणूक होती. नेपाळच्या मावळत्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ एक दिवस आधीच संपला आहे.