रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

लंडन - जगात धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा ब्रिटनच्या सुरक्षा संस्थानी केला आहे. रॅन्समवेअरमुळे जगभरातील अनेक देशांतील संगणक यंत्रणा ठप्प झाली होती व अनेक कंपन्यांचे अफाट नुकसान झाले होते.

लंडन - जगात धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा दावा ब्रिटनच्या सुरक्षा संस्थानी केला आहे. रॅन्समवेअरमुळे जगभरातील अनेक देशांतील संगणक यंत्रणा ठप्प झाली होती व अनेक कंपन्यांचे अफाट नुकसान झाले होते.

जगातील नामवंत मानल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या नॅशनल सायबर सुरक्षा संस्थेने याचा कसून तपास केला आहे. या संस्थेने "बीबीसी'ला दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियातील लाझारूस नावाच्या हॅकर्सच्या गटाने हा सायबर हल्ला घडवून आणला. याच गटाने 2014 मध्ये सोनी पिक्‍सर्सला लक्ष्य बनविले होते. उत्तर कोरियातील हुकूमशाहीवर बेतलेल्या "द इंटरवह्यू' हा सिनेमा प्रदर्शित केल्याने त्यांनी सोनीला लक्ष्य केले होते. अनेक बॅंकातील पैसे चोरण्याच्यामागेदेखील याच गटाचा हात आहे.
गेल्या महिन्यात वॉना क्राय या रॅन्समवेअरने जगातील अनेक संगणक बंद केले व ते सुरू करण्यासाठी पैशांची मागणी केली. ब्रिटनमधील आरोग्यव्यवस्था या हल्ल्यामुळे जवळपास ठप्प झाली होती.

रॅन्मवेअरने ब्रिटनला किंवा त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेला लक्ष्य केलेले होते. प्रचंड पैसा मिळवणे हे या हल्ल्यामागचे कारण होते, मात्र नंतर ते हाताबाहेर गेल्याचे तपासात पुढे आले आहे. यातील खंडणीचा पैसा मिळवताना अजूनही कोणताही हॅकर पुढे आलेला नाही. अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्थेनेदेखील यापूर्वी उत्तर कोरियाकडे अंगुलीनिर्देश केला होता. मात्र, त्यांचा तपास ब्रिटनइतका सखोल नव्हता.

 

Web Title: ransomware marathi news virus cyber crime cyber news