बेल्जियममध्ये बलात्कार पिडितांच्या कपड्यांचे प्रदर्शन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

ब्रुसेल्स - मुलींना कपड्यांचे भान नसते. यातूनच मग बलात्काराच्या घटना घडतात, अशी मुक्ताफळे अनेकदा उधळली जातात. यालाच छेद देण्यासाठी बेल्जियममध्ये एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शानात बलात्कार पिडितांचे कपडे ठेवण्यात आले आहेत.

ब्रुसेल्सच्या मोलेनबीक जिल्ह्यात हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, 'इज इट माय फॉल्ट?' असे या प्रदर्शनाचे नाव आहे. 

बलात्कार पिडितांना मदत करणाऱ्या 'सीएडब्लू इस्ट ब्रेबँड' या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात जम्पसूट पासून पायजमा, ड्रेसेस अशा प्रकारचे कपडे ठेवण्यात आले आहे. 

बलात्काराच्या घटनेनंतर पिडितेवरच बऱ्याचदा आरोप हेतो. की महिलांच्या राहणीमानामुळे अशा घटना घडतात. महिलांच्या उशीरा घरी येण्यावर, कपड्यांवर नेहमी टिप्पणी होते. परंतु, अशा प्रकारच्या घटनेला फक्त अपराधीच जबाबदार असल्याचे मत सीएडब्लूच्या लिसवेथ केन्स यांनी एका संकेतस्थाशी बोलताना व्यक्त केले आहे. 

''हे प्रदर्शन पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, हे सर्वसाधारणच कपडे आहेत. जे कोणीही घालू शकेल''. तसेच यात एक लहान मुलाचा शर्ट देखील आहे. यावरुन परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येईलच'', लिसवेथ केन्स.
 
Web Title: Rape victims' clothing on display at Belgian exhibition