बलात्काऱ्याला तब्बल दीड हजार वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

फ्रेस्नो (कॅलिफोर्निया) : स्वतःच्याच किशोरवयीन मुलीवर सुमारे चार वर्षे सतत बलात्कार केल्याबद्दल अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने तब्बल 1503 वर्षांची अतिशय कठोर शिक्षा ठोठावली आहे.

फ्रेस्नो (कॅलिफोर्निया) : स्वतःच्याच किशोरवयीन मुलीवर सुमारे चार वर्षे सतत बलात्कार केल्याबद्दल अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने तब्बल 1503 वर्षांची अतिशय कठोर शिक्षा ठोठावली आहे.

पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये म्हणून आरोपी असलेल्या तिच्या वडिलांचे नाव बातमीत गुप्त ठेवण्यात आले आहे. फ्रेस्नो येथील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ऐतिहासिक निकाल देत आरोपीला 1503 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीने 2009 ते 2013 या काळात स्वतःच्याच मुलीवर सातत्याने बलात्कार केला. सध्या 23 वर्षांच्या असलेल्या पीडित मुलीने न्यायालयाला सांगितले, की तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल तिच्या वडिलांनी कधीही पश्‍चाताप व्यक्त केला नाही.

पीडित मुलीचे संपूर्ण बालपण तिच्या वडिलांनी उद्‌ध्वस्त केले आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. अंतिम शिक्षा ठोठाविण्यापूर्वी आरोपीला गुन्हा कबूल करण्याची दोन वेळा संधी देण्यात आली होती. गुन्हा कबूल केल्यास 22 वर्षांची शिक्षा होईल, असे त्याला सांगण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव आरोपीने फेटाळून लावले होते. त्यानंतर त्याला न्यायाधीशांनी 1503 वर्षांची कोठर शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: rapist sentenced 1500 years imprisonment