ब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 जून 2016

मुंबई : युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याबात ब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर (ब्रेक्‍झिट) रिझर्व्ह बॅंक लक्ष ठेवून आहे. यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची तयारी रिझर्व्ह बॅंकेने केली असून, वित्तीय बाजारपेठांमध्ये सुव्यवस्था ठेवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

ब्रिटन उद्या सार्वमत घेणार असून, 28 देशांच्या युरोपीय समुदायात राहावयाचे अथवा बाहेर पडायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर वित्तीय बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यास होणाऱ्या परिणांमाबाबत अनेक तर्कवितर्क जगभरात लढविले जात आहेत. याचे परिणाम प्रामुख्याने वित्तीय बाजारपेठा आणि चलन विनिमय बाजारांवर होणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बाजारपेठांमध्ये सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. यात पतपुरवठा आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.

ब्रेक्‍झिटच्या अनिश्‍चिततेमुळे भारतासह जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. भारताचा ब्रिटन आणि युरोपीय समुदायाशी लक्षणीय प्रमाणात व्यापार सुरू आहे. युरोपीय समुदायातून भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा ओघ येत आहे. काल अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यास मोठी उलथापालथ होणार असल्याचे मत व्यक्त केले होते.

ब्रिटनच्या आगामी सार्वमतातील एक घटना गुंतवणूकदारांची दिशा ठरविणार आहे. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यास जागतिक पातळीवर आर्थिक उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. 
- जेनेट येलेन, अध्यक्षा, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह 

Web Title: RBI Brexit