नवलंच! घर विकलं अन् सापडली ५५ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी

नवलंच! घर विकलं अन् सापडली ५५ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी

ही अंगठी रॅन्सम यांची एंगेजमेंट रिंग होती.

काही वस्तूंसोबत आपलं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असतं. त्यामुळे काही ठराविक वस्तू आपण जीवापाड जपत असतो. हीच जीवापाड जपलेली वस्तू एखाद्या वेळी हरवली तर आपण कासावीस होतो. त्यातच अथक प्रयत्न केल्यानंतरही ती सापडली नाही. तर, ठराविक वेळेनंतर आपण तिची आशा सोडून देतो. परंतु, बऱ्याच वर्षानंतर तुमची हरवलेली वस्तू अचानक तुमच्या समोर आली तर? अर्थात तो आनंद शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. एका व्यक्तीची हरवलेली सोन्याची अंगठी (ring) चक्क ५५ वर्षांनंतर सापडली आहे. (wedding-ring-was-lost-55-years-ago-new-owner-got-the-ring-in-tennessee-back-yard)

अमेरिकेतील मफ्रिसबोरो येथे राहणाऱ्या रॅन्सम जोन्स यांची ५५ वर्षापूर्वी अंगठी हरवली होती. आपल्या आई-वडिलांसोबत घरातील साफसफाई करत असतांना घराबाहेरील आवारात त्यांची अंगठी पडली होती. परंतु, त्यावेळी लक्षात न आल्यामुळे ही अंगठी हरवली. बराच शोध घेतल्यानंतरही रॅन्सम यांची अंगठी काही सापडली नाही. विशेष म्हणजे तब्बल ५५ वर्षांनंतर ते घर विकल्यानंतर हरवलेली अंगठी सापडली.

नवलंच! घर विकलं अन् सापडली ५५ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी
JCB चा रंग पिवळाच का असतो माहित आहे?

२००६ मध्ये रॅन्सम यांनी डग आणि सामंथा कुक यांना हे राहतं घर विकलं. मात्र, घर विकण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हरवलेल्या अंगठीविषयी कुक दांम्पत्याला सांगितलं होतं. विशेष म्हणजे कुक बागेत काही तरी काम करत असताना त्यांच्या दृष्टीस ही अंगठी पडली. त्याच वेळी त्यांना रॅन्सम यांनी सांगितलेल्या घटनेची आठवण झाली व त्यांनी अंगठी सापडल्याची माहिती रॅन्सम यांना दिली.

दरम्यान, हरवलेली अंगठी ५५ वर्षानंतर आहे त्याच स्थिती सापडल्यामुळे रॅन्सम यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ही अंगठी रॅन्सम यांची एंगेजमेंट रिंग होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com