रोबो घेतोय उमेदवारांच्या मुलाखती

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जगभरातील सुमारे तीनशे कंपन्यांना "व्हेरा'ने सेवा पुरविली असून, त्यात पेप्सीको, एल ओरियल आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 

मॉस्को : उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची विविध पदांसाठी निवड करण्याचे कौशल्य असलेल्या यंत्रमानवाची (रोबो) निर्मिती रशियातील स्टॅफोरी या स्टार्टअपकडून करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या रोबोचे नाव "व्हेरा' असे आहे. या "व्हेरा' ने आत्तापर्यंत दोन हजार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

जगभरातील सुमारे तीनशे कंपन्यांना "व्हेरा'ने सेवा पुरविली असून, त्यात पेप्सीको, एल ओरियल आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 

वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील उमेदवारांच्या माहितीचा अभ्यास करून व्हेरा या उमेदवारांची मुलाखतही घेते. ती एकाच वेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेऊ शकते. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी व्हेराकडे सोपविली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा फोनकॉल करून व्हेरा उमेदवारांच्या मुलाखती घेते.

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांचा वापर वाढल्यामुळे 2030मध्ये 80 कोटी नोकऱ्या जाणार असल्याचा इशारा "मॅकिन्झी'च्या अहवालात देण्यात आला होता. व्होराची काम करण्याची क्षमता पाहता हा इशारा लवकरच खरा ठरू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot Taking Interview of Candidates