Coronavirus : चीनने मागितली माफी; पण कोणाची?

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

या घटनेमुळे चीनमधील सत्ताधारी पक्षाचा वेगळा चेहरा जगासमोर आल्याची टीका होत आहे.

Coronavirus : बीजिंग : कोरोना व्हायरसच्या संभाव्य उद्रेकाची सर्वांत प्रथम माहिती देणाऱ्या आणि त्याबद्दल कारवाई झालेल्या डॉक्टरची चीनने माफी मागितली आहे. स्वतःची चूक कधीही मान्य न करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने या प्रकरणात आपली गंभीर चूक झाल्याची कबुली दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या विषाणूच्या संभाव्य उद्रेकाबाबत सर्वांत आधी इशारा दिल्याबद्दल वुहानमधील डॉ. ली वेनलिआंग यांच्याविरोधात स्थानिक पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येत असल्याचे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ शिस्तपालन समितीने म्हटले आहे.

आणखी वाचा - ट्रम्प म्हणतात, 'चीनच्या चुकांची किंमत जग मोजतंय'

या प्रकरणात गंभीर चूक झाली असून, त्याबद्दल आम्ही डॉ. वेनलिआंग यांच्या कुटुंबाची माफी मागतो असे समितीने म्हटले आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

कोरोनाच्या विषाणूच्या संभाव्य उद्रेकाचा इशारा दिलेल्या डॉ. वेनलिआंग यांना नंतर याच विषाणूची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. डॉ. वेनलिआंग यांच्या मृत्यूमुळे चीन सरकारच्या विरोधात जगभरात संताप व्यक्त करण्यात आला.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

- Coronavirus : राज्यातील चाचणीचे निकष बदलले; दिवसभरात रुग्णांची संख्या पोहोचली...

दरम्यान, या घटनेमुळे चीनमधील सत्ताधारी पक्षाचा वेगळा चेहरा जगासमोर आल्याची टीका होत आहे. आजारांचा उद्रेक, औद्योगिक अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक गैरव्यवहार आदींबाबतची माहिती दडवून ठेवते किंवा चुकीची माहिती दिली जाते, असा आरोप चीन सरकारवर अनेकदा केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruling Communist Party of China has apologies family of corona whistleblower doctor