-52 अंशात 'ते' धावले 42 किमी मॅरेथॉन

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

-52 डिग्री सेल्सिअस वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. पाच जानेवारी रोजी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

ओयमीकॉन (रशिया) - या गावातील तापमान -52 डिग्री सेल्सिअस होते. अशा या वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. सैबेरियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाच जानेवारी रोजी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

marathon

 

यामध्ये 21 ते 71 वयोगटातील धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला धावपटूचांही समावेश होता. यातील आठ मुलांची आई असलेली एक महिला धावपटू चार तासात 26 किलोमीटर धावली. तर एकाहत्तर वर्षाचे धावपटू अडीच तासात 15 किलोमीटर धावले. अशा तापमानात धावण्यासाठी या धावपटूंना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. 

marathon

'टुरू' टूर एजन्सीचे मालक अलेक्झांडर क्रायलोव्ह यांनी या मॅरेथॉमचे आयोजन केले होते. पुढच्या वर्षी देखील अशाप्रकारे मॅरेथॉनचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.marathon

marathon

Web Title: Runners Compete in World’s Coldest Race at -52 Degrees Celsius