Vladimir Putin News : पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न! युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा | Ukraine Attempted Vladimir Putin Assassination | Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin News

Vladimir Putin News : पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न! युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने पुतिन यांच्या घरावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाकडून याला दहशतवादाचे कृत्य म्हटले असून याच्या उत्तरादाखल कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

क्रेमलिनने जारी केलेल्या एका वक्तव्यात हा दावा करण्यात आला असून यामध्ये एक मानवरहित व्हेकल (ड्रोन) रशियाला पाठवले होते आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन हे त्यांचे लक्ष्य होते. दरम्यान हे ड्रोन पाडण्यात आले आहे. आम्ही हे नियोजित दहशतवादी कृत्य मानतो. रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांच्या हत्येचा हा एक प्रयत्न होता. या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही असेही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कामकाजामध्ये कुठलाही बदल केला नसल्याचे म्हटले आहे. ते नेहमीप्रमाणे चालू राहील. आम्ही बदला घेण्याच्या अधिकाराखाली कारवाई करू. सध्याची परिस्थिती पाहता हे योग्य आहे.मात्र या प्रकरणी युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.