...हे तर आर्थिक युद्ध: रशियाचा अमेरिकेवर आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

रशिया-अमेरिका संबंध सुधारण्याच्या सर्व आशा "जाड कातडीच्या' ट्रम्प यांनी धुळीला मिळविल्या असून, रशियाविरोधात पुकारलेले हे आर्थिक युद्ध असल्याचे आम्ही मानतो

मॉस्को - अमेरिकेने रशियावर घातलेले नवे निर्बंध म्हणजे थेटपणे पुकारलेले आर्थिक युद्धच आहे, अशी जोरदार टीका रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी केली आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कमकुवतपणा दिसून येत असून, संबंध सुधारण्याच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या असल्याचेही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियावरील निर्बंधाच्या विधेयकावर सही केली. मेदवेदेव यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका करताना, परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.

मेदवेदेव म्हणाले, ""रशिया-अमेरिका संबंध सुधारण्याच्या सर्व आशा "जाड कातडीच्या' ट्रम्प यांनी धुळीला मिळविल्या असून, रशियाविरोधात पुकारलेले हे आर्थिक युद्ध असल्याचे आम्ही मानतो. ट्रम्प प्रशासनाने मानहानी स्वीकारत आपले अधिकार संसदेच्या हाती दिल्यामुळे त्यांचा कमकुवतपणा दिसून येतो.''

Web Title: Russia criticizes usa