सीरियात सैन्यकपातीचा रशियाचा निर्णय

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

सप्टेंबर 2015 पासून रशियाने सीरियात सैन्यदल पाठवून बशीर अल असाद यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यामुळे असाद यांच्या सैन्याने बंडखोरांवर बऱ्यापैकी ताबा मिळविला. गेल्या महिन्यात असाद यांच्या सैन्याने पाच वर्षातील पहिला मोठा विजय मिळविला. आता रशियाने तेथील वादावर राजकीय तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत

मॉस्को - सीरियातील सैन्य हळूहळू कमी करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. संघर्षाच्या भूमीवरून प्रथम रशियाच्या विमानवाहू नौका बाहेर पडणार आहेत. याबाबतचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.

या वृत्तात रशियाचे लष्करप्रमुख वलेरी गेरीसिमोव्ह यांनी म्हटले आहे की, अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानुसार सीरियातील सैन्य कमी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. प्रथम नौदलाची जहाजे सीरियातून बाहेर पडतील. या जहाजांना दिलेली जबाबदारी आता पूर्ण झालेली आहे. अर्थात अजूनही सीरियात रशियाचे पुरेसे सैन्य व रणगाडे आहेत.''

सप्टेंबर 2015 पासून रशियाने सीरियात सैन्यदल पाठवून बशीर अल असाद यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यामुळे असाद यांच्या सैन्याने बंडखोरांवर बऱ्यापैकी ताबा मिळविला. गेल्या महिन्यात असाद यांच्या सैन्याने पाच वर्षातील पहिला मोठा विजय मिळविला. आता रशियाने तेथील वादावर राजकीय तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात रशियाने तेथे युद्धबंदी जाहीर केली आता सैन्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाप्रमाणेच इराण व तुर्कस्तानही आता सीरियात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: russia to reduce forces in syria

टॅग्स