'थोडं लष्करी साहित्य द्या!' युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाने चीनकडे मागितली मदत | Russia asks for military equipment from China | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia asks for military equipment from China

'थोडं लष्करी साहित्य द्या!' युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाने चीनकडे मागितली मदत

24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं. हे युद्ध अजूनही थांबलं नाहीये. शांतता चर्चेची चौथी फेरी आज होणार असून त्यामध्ये काही निर्णायक तोडगा निघतो का, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे, या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने चीनकडे लष्करी मागितली असून काही लष्करी उपकरणे चीनकडून घेतली आहेत, अशी माहिती फायनान्शियल टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टने काल रविवारी अमेरिकन अधिकार्‍यांचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: तुम्हीच व्हा की! काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा राहुल गांधींच्याच नावाची चर्चा

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी सोमवारी रोममध्ये चीनचे सर्वोच्च प्रतिनिधी यांग जिएची यांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय. तशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. रशियाने युक्रेनमधील आपल्या या लष्करी कारवाईला "विशेष ऑपरेशन" म्हटलंय. रशियाच्या या कारवाईला चीनने सहकार्य करण्याची मागणी करत रशियाने मदत मागितली आहे. चीन सध्या मानवी हक्क आणि इतर मुद्द्यांबाबत सध्या तीव्र अशा पाश्चात्य दबावाखाली आहे.

हेही वाचा: ...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

बीजिंगने रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला नाहीये. तसेच रशियाच्या या कृतीला आक्रमण देखील म्हटलं नाहीये. परंतु वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने यावर कसल्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटलंय की, रशियाने कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्रे चीनकडे मागितली आणि या मागणीला चीनने नेमका कशाप्रकारे प्रतिसाद दिला आहे, याबाबत ही माहिती देणाऱ्या अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही.

Web Title: Russia Seeks Military Equipment From China After Ukraine Invasion Reports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top