Russia-Ukrain: रशियाची मोठी घोषणा; उद्या युक्रेनचे 4 प्रदेश अधिकृतरित्या रशियाला जोडणार

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रवक्त्याने दिली माहिती
Vladimir Putin
Vladimir Putin esakal

मॉस्को : युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. रशियानं युद्धात युक्रेनचे चार प्रांत काबिज केले असून हे प्रांत उद्या अधिकृतरित्या रशियाच्या हद्दीला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या प्रवक्त्यानं आज ही माहिती दिली. (Russia to formally annex four Ukraine regions tomorrow)

प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, "उद्या ग्रँड क्रेमलिन पॅलेसच्या जॉर्जियन हॉलमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता (आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजता) रशियामध्ये नवीन प्रदेशांच्या समावेशाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या होतील"

Vladimir Putin
Monsoon withdraws : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची मोठी अपडेट

युक्रेनचे लुगांस्क, डोनेस्तक, खेरसन आणि झापोरिझ्झिया हे प्रदेश रशियन सैन्याच्या ताब्यात आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतिन यांनी सैन्याला या राज्यांच्या सीमेवर तैनात केले होते. रशियाने त्याचे नियंत्रण असलेल्या चार प्रदेशांमध्ये सार्वमताचं देखील आयोजन केलं आहे. क्रेमलिनच्या रहिवाशांनी रशियामध्ये सामील होण्यास पाठिंबा दर्शविल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Vladimir Putin
Assam : आसाममध्ये मोठी दुर्घटना! ३० जणांना नेणारी बोट ब्रम्हपुत्रेत बुडाली, अनेक बेपत्ता

रशियानं युक्रेनमधून क्रिमिया द्वीपकल्प जोडल्यानंतर आठ वर्षांनंतर तशाच प्रकारचं पाऊल उचललं असून नवे चार प्रांत काबीज केले आहेत. मात्र, यामुळं रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाश्चिमात्य देशांनी रशियाला ताकीद दिलीए की हे पाऊल योग्य नसून "याला कधीही ओळख मिळणार नाही" असं जी 7 ने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com