व्लादिमीर पुतीन यांच्या रणनीतीत अमेरिका फसली, युद्धात उतरणे बनले अवघड | Russia Ukraine Conflict | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

व्लादिमीर पुतीन यांच्या रणनीतीत अमेरिका फसली, युद्धात उतरणे बनले अवघड

गेल्या काही आठवड्यांपासून सतत व्लादिमीर पुतीन सांगत आहेत, की त्यांची युक्रेनवर हल्ले करण्याचे कोणतेही नियोजन नाही. मात्र गुरुवारी (ता.२४) सकाळी रशियाने (Russia) पूर्ण जगाला धक्का देत युद्धाची घोषणा केली. काही तासांमध्ये रशियन सेनेच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे अनेक विमानतळ आणि हवाई सुरक्षांची स्थळे नष्ट झाली आहेत. मात्र रशियाला सतत परिणाम भोगण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेने याच्या प्रत्युत्तरादखल कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. हल्ल्यानंतर तात्काळ युक्रेनचे (Ukraine) राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोनवर संवाद साधला. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले की त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जाईल. (Russia Ukraine Conflict America Trap In Vladimir Putin Strategy)

हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्धाचा फटका कच्च्या तेलावर! पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार वाढ ?

मात्र त्यांनी अमेरिका किंवा नाटोची सेना युक्रेनमध्ये पाठविण्यावर काही म्हटले नाही. अशा स्थितीत हा प्रश्न उपस्थित होतो की अमेरिका पुतीनच्या रणनीतीमध्ये घेरले गेले का? या प्रश्नाला उत्तर देताना माजी राजनयिक अधिकारी विवेक काटजू एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की निश्चितच अमेरिका घेरली गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे फार सामर्थ्यवान नेते नाहीत. या व्यतिरिक्त फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅनही याच पंक्तीतील आहेत. जर नाटोची सेना युद्धात उतरली तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. यातून तिसऱ्या महायुद्ध होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अमेरिकेसह सर्व नाटो देश युद्धात सहभागी होण्यापासून वाचत आहेत. (Russia Ukraine Conflict)

हेही वाचा: पुतिन यांची अलिशान 'जलपरी'; फोटो पाहून डोळे विस्फारतील

युक्रेनवरील हल्ल्यांसाठी पुतिन यांनी निवडला अचूक वेळ

परराष्ट्र राजकारणाचे अभ्यासक म्हणतात, की व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ल्यासाठी योग्य वेळ निवडली आहे. याचे कारण आहे, की अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैनिकांची घर वापसीनंतर जो बायडेन हे घेरले गेले आहेत. आर्थिक पातळीवर अमेरिका पूर्वीसारखी महाशक्ती राहिलेली नाही. चीन आणि भारताने रशियाबरोबर असलेल्या संबंधांमुळे कोणत्याही गटात सहभागी होण्याचे टाळले आहे.

Web Title: Russia Ukraine Conflict America Trap In Vladimir Putin Strategy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top