
Russia ukraine war : युध्दज्वराची वर्षपूर्ती
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर आक्रमण करण्याची घोषणा केली आणि कोरोनानंतर जगाला नव्या संकटात टाकले. या संघर्षामुळे दोन्ही देशांची आर्थिक आणि मनुष्यहानी होत असताना जगातील पुरवठा साखळी विस्कळीत करण्यास हातभार लागत आहे.
फेब्रुवारी २०२२
२४ : रशियाने मोठा हल्ला करत युक्रेनवर तिन्ही भागातून आक्रमण करत युद्ध छेडले. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहिम सुरू केल्याची घोषणा केली.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्यावर प्रखर टीका केली. रशिया हा वाईटाच्या मार्गावर जात असल्याचे ते म्हणाले. परंतु युक्रेन आपला बचाव करेल, अशा शब्दांत त्यांनी आक्रमणाला उत्तर दिले.
मार्च
२५ : युक्रेनच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागात हल्ला करणाऱ्या रशियाला प्रत्युत्तर देण्यास युक्रेनच्या सैनिकांनी सुरवात केली.
१ : रशियाने किव्ह येथील एका टिव्ही टॉवरवर हल्ला केला. खारकिव्ह आणि अन्य शहरांवर बॉम्ब हल्ले सुरू केले. त्याचवेळी पुरवठ्यात अडचणी येऊ लागल्याने रशिया सैनिकांना किव्हपर्यंत पोचण्यात अपयश येऊ लागले.
२ : रशियाच्या सैनिकांनी दक्षिण बंदराचे शहर मारियोपोल येथे १४ तासांहून अधिक काळ बॉम्बहल्ले केले. शहराची रशियाकडून नाकाबंदी.
३ : दहा लाखांच्या आसपास नागरिकांचे युक्रेनमधून पलायन.
४ : रशियाने युरोपातील झॅपोरेझ्झिया अणुऊर्जा केंद्रावर ताबा मिळवला.
८ : मानवी कॉरिडॉरच्या माध्यमातून नागरिकांनी रशियाच्या ताब्यात असलेल्या सुमी शहरातून पलायन सुरू केले. आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेन सोडले.
९ : मारिओपोल येथील प्रसुतीगृहावर रशियाचा हल्ला.
१३ : पोलंडजवळील यावोरिव्ह तळावर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले. त्यात ३५ नागरिकांचा मृत्यू आणि १३४ जखमी.
२९ : युक्रेनने इस्तंबूल येथे होणाऱ्या चर्चेत तठस्थेची स्थिती अंगिकारण्याचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत ४० लाख लोकांचे देशातून स्थलांतर.
३० : युक्रेनकडून किव्हच्या परिसरातील क्षेत्र पुन्हा ताब्यात. रशियन सैनिकांना रणगाडे सोडून पळावे लागले.
एप्रिल
८ : युक्रेनमधील क्रामतारोस्कच्या रेल्वे स्थानकावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला. त्यात ५२ जणांचा मृत्यू. रशियाने हल्ल्याची जबाबदारी नाकारली.
१४ : रशियाचे लढाऊ जहाज काळ्या समुद्रात बुडाले. स्फोटांमुळे जहाज बुडल्याचा रशियाचा दावा.
२१ : दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ रशियाच्या ताब्यात असलेले शहर मारिओपोलच्या स्वातंत्र्याची पुतीन यांच्याकडून घोषणा
२९ : किव्ह भागात ११५० नागरिकांचे मृतदेह सापडल्याचे युक्रेनी सैनिकांकडून स्पष्टीकरण
मे
२ : युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी युक्रेनच्या २० टक्के भागावर रशियाचा ताबा असल्याचे मान्य केले.
९ : युद्धामुळे निर्वासितांची संख्या ६० लाखांवर पोचली.
१३ : खारकिव्हच्या बाह्य भागात युक्रेनच्या तुफान बॉम्ब हल्ल्यांमुळे रशियाची माघार.
१७ : मारियोपोल येथे युक्रेन सैनिकांची शरणागती.
१८ : २१ वर्षीय युद्ध कैदी रशियन कमांडर वाडिम श्यासिमिरीनकडून गुन्हा कबुल. त्याच्यावर युक्रेन नागरिकाच्या हत्येचा आरोप
जून
३० : रशियाने ओडेसाच्या काळ्या समुद्राच्या बंदरापासून काही अंतरावर असलेल्या स्नेक बेटावरून माघार घेतली. रशियाने आक्रमणाच्या सुरवातीच्या दिवसात या बेटाचा ताबा घेतला होता.
जुलै
२२ : रशिया आणि युक्रेन, तुर्की आणि संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने युक्रेनच्या काळ्या समुद्रातील बंदरात अडकलेला धान्याचा पुरवठा पूर्ववत करण्यावर सहमती.
२९ : रशियाच्या वर्चस्वाखालील पूर्वेकडील ओलोनिव्का शहरातील तुरुंगावर क्षेणास्त्र हल्ले. या ठिकाणी युक्रेनचे सैनिक बंदिस्त असल्याचा दावा. त्यात किमान ५३ जणांचा मृत्यू.
ऑगस्ट
९ : क्रिमियातील हवाई तळावर शक्तीशाली स्फोट. आठवडाभरानंतर वीज उपकेंद्र आणि दारुगोळाच्या साठा स्फोटाने उडविला. क्रिमियावरील हल्ले केल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून मान्य.
२० : रशियाचे विचारवंत अलेक्झांडर डुगिन यांची कन्या दर्या डुगिना यांचा मॉस्कोजवळ मोटार स्फोटात मृत्यू. या स्फोटाला युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप.
सप्टेंबर
६ : युक्रेन सैनिकांकडून खारकिव्ह येथे प्रतिकार. त्यामुळे रशियाला माघार घेण्यास भाग पडले.
२१ : तीन लाख लोकांची भरती करण्याची पुतीन यांची घोषणा. युक्रेनच्या दोनेत्स्क, लुहान्स्क, खेरासन आणि झॅपोरेझ्झिया प्रांताचे रशियात विलीन करण्यासाठी बेकायदापणे सार्वमत घेतले.
३० : पुतीन यांच्याकडून चार प्रांतांना रशियाला जोडण्याच्या करारावर स्वाक्षरी.
ऑक्टोबर
८ : क्रिमियाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक उडविला. रशियाने युक्रेनचे वीज प्रकल्प, अन्य पायाभूत सुविधांवर हल्ले करत प्रत्युत्तर दिले.
डिसेंबर
५ : रशियाच्या हद्दीत दोन तळांना लक्ष्य करण्यासाठी युक्रेनकडून ड्रोनचा वापर केल्याचा रशियाचा दावा
२१ : युद्धाच्या काळात झेलेन्स्की प्रथमच देशाबाहेर. अमेरिकेला भेट. अध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा.
जानेवारी २०२३
१ : रशियाच्या मकिव्हका शहरावर युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रशियाच्या ८९ सैनिकांचा मृत्यू. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आकडा शंभरावर असल्याचे सांगितले.
१२ : मिठाचे आगार असलेले सोलेडारवरथे ताबा मिळविल्याचे रशियाकडून जाहीर. यासाठी रशियन सैनिकांनी अनेक महिने संघर्ष केला. युक्रेनमधील बाखुत ताब्यात घेण्यासाठी रशियाकडून हल्ले सुरू.
१४ : रशियाकडून युक्रेनमधील वीज प्रकल्पावर हल्ले. डिन्प्रो शहरातील अपार्टमेंटवर रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४५ जणांचा मृत्यू,