russia ukraine war Attempted genocide in Ukraine Joe Biden criticizes Putin
russia ukraine war Attempted genocide in Ukraine Joe Biden criticizes Putinsakal

युक्रेनमध्ये वंशच्छेदाचाच प्रयत्न; ज्यो बायडेन यांची पुतीन यांच्यावर टीका

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे युक्रेनमध्ये वंशच्छेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, बायडेन

डे मॉइन : रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा वंशच्छेदच आहे. पुतीन यांचा ‘युक्रेनी नागरिक’ ही संकल्पनाच नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज केली. आयोवा राज्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बायडेन यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे ही दरवाढ होत असल्याचे सांगितले.

तसेच, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे युक्रेनमध्ये वंशच्छेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मला वाटते, असेही बायडेन म्हणाले. बायडेन यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही अथवा अमेरिकेने रशियावर नवे निर्बंधही जारी केले नाहीत. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी मात्र बायडेन यांच्या या विधानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

रासायनिक हल्ल्याच्या पुराव्याचा शोध

रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केला असल्यास अमेरिका शांत बसणार नाही, असे काँग्रेसच्या काही सदस्यांनी सांगितले. त्यांनी काही दिवसांपूर्वी पोलंडला भेट दिली होती. मारिऊपोल येथे झालेल्या हल्ल्यात विषारी पदार्थांचा वापर झाल्याचा आरोपअसून तपास सुरु आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • पुतीन यांच्या निकटवर्तीय उद्योगपतीला युक्रेनमध्ये अटक

  • बुका शहरात ७२० जणांची हत्या झाल्याचा युक्रेनचा दावा

  • सैन्य माघारी घेण्याचे जर्मनीचे रशियाला आवाहन

  • खारकिव्हमध्ये रशियाचे जोरदार हल्ले

मारिउपोलवर ताबा : रशिया

युक्रेनमधील अत्यंत मोक्याचे बंदर असलेल्या मारिउपोल शहरावर ताबा मिळविल्याचा दावा रशियाने केला आहे. या शहरात विजय संचलन करत असल्याची छायाचित्रेही रशियाच्या सैन्याने प्रसिद्ध केली आहेत. गेले काही आठवडे या शहराला त्यांनी पूर्ण वेढा घातला होता. आज युक्रेनच्या १,०२६ सैनिकांनी शरणागती पत्करली असल्याचे रशियाने सांगितले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आमचे सैन्य अजूनही तेथे लढत असून त्यांना आणखी कुमक लवकरच मिळणार आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. या शहरात एक लाख लोक अडकून पडले असून रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत २१ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा मारिउपोलच्या महापौरांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com