रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू; ९० जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia ukraine war crisis missile strike kills 17 and 90 people injured

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू; ९० जखमी

किव्ह : रशियाच्या क्षेपणास्त्रांनी आज युक्रेनच्या मध्य भागात असलेल्या व्हिनित्शिया या शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९० हून अधिक जण जखमी झाले. रशियाकडून वारंवार ‘दहशतवादी’ हल्ले होत असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे.

युक्रेनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिनित्शिया शहरावर आज रशियाने सात क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी तीन क्षेपणास्त्रे एक सरकारी कार्यालय आणि त्याजवळच्या रहिवासी इमारतींवर कोसळली. क्षेपणास्त्रांचा स्फोट झाल्यानंतर इमारतींच्या पार्किंगमध्ये असलेल्या सुमारे ५० मोटारींना आग लागली. उर्वरित चार क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे हवेतच नष्ट करण्यात आली. मात्र, इमारतींवर झालेल्या हल्ल्यात एका लहान बालकासह १७ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ९० जणांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय धोरण आखावे

हेग : युक्रेन युद्धाला कारणीभूत असणाऱ्यांना योग्य शिक्षा व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरण आखून समन्वयाने त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज व्यक्त करण्यात आली. रशियाने युक्रेनमध्ये हल्ले सुरु केल्यापासून रशियन सैन्याने सामान्य नागरिकांवर अत्याचार केल्याचे अनेक आरोप झाले आहेत. हे सर्व युद्धगुन्हे म्हणून जाहीर करून त्यांच्याविरोधात खटला चालवावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात करण्यात आली आहे.

Web Title: Russia Ukraine War Crisis Missile Strike Kills 17 And 90 People Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top