लेकीला कवटाळून ढसा ढसा रडला तो बाप, भावूक व्हिडिओ व्हायरल

लेकीला कवटाळून ढसा ढसा रडला तो बाप, भावूक व्हिडिओ व्हायरल

युक्रेन रशियाच्या हल्ल्याचा (Russia Ukraine Crisis) सामना करत आहे. सगळीकडे विनाश होत असल्याचे चित्र दिसत आहे. कित्येक लोक आपल्या माणसासाठी चिंतित आहे तर कित्येक जण जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधत आहे. रशियन (Russia) सैन्याने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून लोक आपले घरे सोडून पळून जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर वारंवार येत आहेत. दरम्यान युक्रेनमधून(Ukraine) एक भावूक करणारा व्हिडिओ (Heartbreaking emotional Video)समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये एक युक्रेन नागरिक आपल्या छोट्या मुलीला छातीशी कवटाळून रडत आहे. हा व्यक्ती आपल्या मुलीला सुरक्षित ठिकाणी पाठवत आहे जे रशियाच्या हल्ल्यांपासून नागरिकांना वाचविण्यासाठी बनवले आहे आणि स्वत: मागे राहून रशियाच्या सैन्याचा सामना करणार आहे.(Russia Ukraine War Video of Soldier of Ukraine says goodbye his daughter)

ट्विटर हँडल @MehranAnjumMir ने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवत आहे. आपल्या छोट्या मुलीचा निरोप घेताना तो ढसा ढसा रडतो आहे. आपल्या मुलीचा निरोप घेऊन तो बाप रशियाच्या सैन्यांचा सामना करण्यासाठी तेथेच थांबला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाचा आहे हे अद्याप समजू शकले नाही.

युक्रेनने सांगितले की, रशियाचे सैन्य कीव च्या आसापासच्या परिसराच पोहचण्यास यशस्वी ठरले आहे आणि शहराजवळ एक एअरबेसवर युद्ध सुरू आहे. वृत्तसंस्था एएफपीने सांगितले की, उत्तरी भागातील लोकांनी कमी उड्डाण करणारे हेलिकॉप्टर पाहिली आहेत.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये एक युक्रेनियन सैनिक दिसत आहे. "आम्ही खूप बॉम्बर्डमेंटखाली आहोत.. आई.. बाबा.. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो" असे तो आपल्या कुटंबाला सांगत आहे. तो आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटू शकेल की नाही याबद्दल त्याला खात्री नाही असे या व्हिडिओवरून दिसत आहे.

पाश्चिमात्य आणि इतर राष्ट्रांनी अनेक निर्बंध लादूनही रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. रशियन आक्रमणापासून पळून आलेल्या निर्वासितांना अमेरिकेने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची सर्व LIVE अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com