Oil Purchase from Russia: आम्हालाच प्रश्न विचारता बाकीच्या देशांना का नाही? विदेश मंत्री संतापले

युद्धाचे पडसाद अद्याप काही देशांवर उमटताना दिसत आहे. त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.
Russia Ukraine war international external affairs minister s jayshankar
Russia Ukraine war international external affairs minister s jayshankar esakal

रशिया - युक्रेन (Ukraine War) युद्धाचे पडसाद अद्याप काही देशांवर उमटताना दिसत आहे. त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतो या निर्णयावर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती. त्यावर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी त्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे. जे कोणी त्या निर्णयावर टीका करत आहे त्यांनी सध्याची परिस्थिती तसेच युक्रेनसोबत (Social media news) रशियाचे जे युद्ध सुरु आहे त्यामुळे विकसनशील देशांवर आगामी काळात होणारे परिणाम काय आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. जगभरातील काही देशांनी भारतावर रशियाकडून तेलाची आयात केल्याप्रकरणी टीका केली आहे. त्यालाही जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.

एस जयशंकर यांनी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टीकेवर सडेतोडपणे उत्तर दिले आहे. त्यांनी दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे. त्यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. युक्रेनकडून देखील विकसनशील देशांना नेमका कोणत्या प्रकारचा धोका आहे हे आपण ओळखण्याची गरज आहे. असे जयशंकर यांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा व्यापक परिणाम जगातील अनेक प्रमुख राष्ट्रांवर झाल्याचे दिसून येत आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांत त्यांच्यातील वाद संपुष्टात येईल अशी चिन्हे होती. मात्र परिस्थिती आणखी चिघळत असल्यानं दोन्ही देशांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

जगभरातील अनेक देशांनी रशियावर टीका करत युक्रेनची बाजु घेतली आहे. दुसरीकडे भारतानं मोठ्या प्रमाणावपर रशियाकडून तेलाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत विचारणा केली आहे. त्यांनी सध्याच्या परिस्थितीत रशियाकडून तेल आयात करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न सत्ताधारी पक्षाला विचारत त्यांनी केलेल्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. यासगळ्या प्रकरणावर एस जयशंकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. दरवेळी भारतावर टीका करुन काहीही उपयोग नाही तर युरोप खंडातील बाकीचे जे देश आहे ते देखील रशियाकडून तेल आणि गॅसची मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. त्याकडेही आपण लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली आहे.

रशियाकडून तेल खरेदी करुन भारत युक्रेनच्या युद्धासाठी रशियाला फंडिंग तर करत नाही ना...अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर जयशंकर म्हणाले, मला कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही. रशियाकडून तेल किंवा गॅस खरेदी करुन आपण रशियाला फंडिंग करतो आहोत असं कुणी म्हणत असेल तर बाकीचे देश काय करत आहे हा प्रश्न आपण विचारणार आहोत की नाही, त्याकडे कुणाचे लक्षच नाही. बाकीच्या युरोपीय खंडामध्ये तेल आणि गॅस मग कुठून येत आहे हे कुणी सांगेल का...जयशंकर यांनी हे वक्तव्य स्लोवाकिया मध्ये आयोजित GLOBSEC 2022 ब्रातिस्लावा फोरममध्ये केले आहे.

Russia Ukraine war international external affairs minister s jayshankar
रशिया युद्धभूमीवरील शस्त्रांसाठी भारताद्वारे पाश्चात्य घटक मिळवतो : UK Report

भारताकडून जी तेल खरेदी करण्यात आली आहे त्याविषयी जयशंकर म्हणाले, युरोपीय संघाकडून तेल खरेदीबाबत जे निर्बंध, अटी घालून दिल्या आहेत त्यानुसार केले आहे. तसेच युरोपीय महासंघानं युरोपीय खंडातील काही देशांच्या सुरक्षेचा आणि हितसंबंधाचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांच्या तेल आणि गॅस खरेदीवर निर्बंध आणले आहेत. जर बाकीच्या देशांना आम्ही रशियाकडून तेल खरेदी केल्याचा एवढा राग आहे तर मग ते इराण, इराकला बाजारात तेल का आणू देत नाही असा प्रश्नही जयशंकर यांनी उपस्थित केला आहे.

Russia Ukraine war international external affairs minister s jayshankar
Russia-Ukraine युद्धामुळे जगावर अन्नधान्य टंचाईचं संकट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com