'फिनलंड, स्वीडन नाटोमध्ये सामील झाले तर आम्ही..'; रशियाची धमकी

russia ukraine war russia threatens nuclear deployment if finland sweden join nato
russia ukraine war russia threatens nuclear deployment if finland sweden join nato

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दादरम्यान फिनलंड किंवा स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास रशिया बाल्टिक देश आणि स्कॅन्डिनेव्हिया जवळ आण्विक शस्त्रे तैनात करेल, असा इशारा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी अमेरिका (US) आणि युरोपियन युनियन(UN) ला दिला आहे.

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव म्हणाले की, स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाले मेदवेदेव यांनी टेलीग्रामवर सांगितले की, जर हे देश NATO मध्ये सामील झाले तर ते NATO सदस्यांसह रशियाची सीमा दुपटीहून अधिक वाढवेल. त्यामुळे साहजिकच आम्हाला या सीमांना बळकटी द्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात बाल्टिक नॉन-न्यूक्लियर परिस्थितीबद्दल अधिक बोलणे शक्य होणार नाही, असे माजी राष्ट्रपतींनी म्हटले आहे. या परिस्थितीत संतुलन राखणे गरजेचे असेल. त्यामुळे रशियाला या प्रदेशात अण्वस्त्रे तैनात करण्याचा अधिकार असेल. रशिया आपले भूदल आणि हवाई संरक्षण बळकट करेल आणि फिनलंडच्या आखातात महत्त्वाचे नौदल तैनात करेल, असेही त्यांनी सांगितले.

russia ukraine war russia threatens nuclear deployment if finland sweden join nato
भाजप नेत्यांनाच कसा दिलासा मिळतो? गृहमंत्री वळसेंचा सवाल

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले की, याबद्दल अनेकदा बोलले गेले आहे आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नाटोच्या वाढत्या लष्करी क्षमतेमुळे आपली पश्चिम बाजू मजबूत करण्याचा आदेश जारी केला आहे. जेव्हा विचारले गेले की या हालचालीत अण्वस्त्रांचा समावेश असेल का? पेस्कोव्ह म्हणाले की मी सांगू शकत नाही परंतु उपाययोजनांची, आवश्यक निर्णयांची एक संपूर्ण यादीच असेल, राष्ट्राध्यक्ष एका वेगळ्या बैठकीत ते कव्हर करतील.

russia ukraine war russia threatens nuclear deployment if finland sweden join nato
"महिला मुख्यमंत्री असतानाही…"; ममता बॅनर्जींना खासदाराचा घरचा आहेर

स्वीडन आणि फिनलंडमध्ये चर्चा सुरू

रशियाशी 1,300-किमी (810-मैल) सीमा असलेली फिनलंड आणि स्वीडन नाटो युतीमध्ये सामील व्हावे की नाही यावर विचार करत आहेत. फिनलंड पुढील काही आठवड्यांत निर्णय घेईल, असे पंतप्रधान सना मारिन यांनी बुधवारी सांगितले.

russia ukraine war russia threatens nuclear deployment if finland sweden join nato
OnePlus 10R कधी लॉंच होणार?, जाणून घ्या स्मार्टफोनबद्दल सर्वकाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com