रशियाकडून लसीच्या सामुदायिक चाचण्या 

वृत्तसंस्था
Friday, 21 August 2020

रशियाने कोरोनावरील या लसीला स्पुटनिक-५ असे नाव आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील काही छोट्या समुहांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून आता तिच्या अधिक व्यापक प्रमाणावर चाचण्या घेण्यात येतील.

मॉस्को - कोरोनावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या रशियाने आता तिच्या सामूहिक चाचण्यांसाठी (मास टेस्टिंग) वेगाने पाऊले टाकायला सुरवात केली आहे. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या देशांतर्गत नियामक यंत्रणेची देखील रशियन सरकार लवकरच मान्यता मिळवण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यामध्ये रशिया ४० हजार लोकांचे लसीकरण करणार असून आंतरराष्ट्रीय शोधसंस्थांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या लशीची माहिती रशियाकडून आंतरराष्ट्रीय संस्थांना माहिती दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रशियाने कोरोनावरील या लसीला स्पुटनिक-५ असे नाव आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील काही छोट्या समुहांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून आता तिच्या अधिक व्यापक प्रमाणावर चाचण्या घेण्यात येतील. सध्या जगभरातील बऱ्याचशा देशांकडून लशीसाठी मागणी नोंदविण्यात आली असून आमची क्षमता ही दरवर्षी पाचशे दशलक्ष लशीच्या निर्मितीची आहे असे रशियन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान रशियन लसीचे निष्कर्ष पुढील महिन्यामध्ये सार्वजनिक केले जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia vaccine update Russia is now fast approaching mass testing