esakal | 10 वर्षांचा मुलगा बाळाचा बाप असल्याचा अल्पवयीन मुलीचा आरोप; DNA रिपोर्ट आला समोर
sakal

बोलून बातमी शोधा

baby child

काही महिन्यांपूर्वी रशियातील एका अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी मुलीने 10 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता.

10 वर्षांचा मुलगा बाळाचा बाप असल्याचा अल्पवयीन मुलीचा आरोप; DNA रिपोर्ट आला समोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मॉस्को - काही महिन्यांपूर्वी रशियातील एका अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी मुलीने 10 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. शेवटी या प्रकरणाचा तपास करत असताना डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यामधून मुलीने केलेला आरोप खोटा असून बाळाचा बाप दहा वर्षीय मुलगा नाही तर इतर कोणी असल्याचं समोर आलं आहे. मुलीने गेल्या वर्षी दहा वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप करत गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ही बाब धक्कादायक असून डॉक्टरांनी असं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. आता मुलीनेही दुसऱ्या एका मुलाने बलात्कार केल्याचं मान्य केलं आहे. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार 13 वर्षाच्या मुलीने 11 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर डीएनए टेस्ट करण्यात आली. तेव्हा मुलीचा बाप हा आरोप करण्यात आलेला 11 वर्षीय मुलगा नसून दुसरंच कोणी असल्याचं समोर आलं आहे. मुलीनेही तिच्यावर बलात्कार झाल्याचं आणि बाळाचा बाप दुसरा एक मुलगा असल्याचं मान्य केलं आहे. 

हे वाचा - सौदी कोर्टाने बदलला निर्णय; 5 दोषींना आता 20-20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

दरम्यानच्या काळात मुलीने ज्या मुलावर बलात्काराचा आरोप केला त्याच्याशी चांगली मैत्री झाली आहे. 16 ऑगस्टला दोघेही रुग्णालयातून बाळाला घरी आणण्यासाठी एकत्रच गेले होते. बाळाचं नामकरणही कऱण्यात आलं असून दोघेही जेव्हा रुग्णालयात गेले होते तेव्हा त्यांचे पालकही सोबत होते. 

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ज्यावेळी मुलावर आरोप केला तेव्हा तो 10 वर्षांचा होता. या वयात बाप बननं शक्य नाही. मुलीच्या कबुलीनंतर हे स्पष्ट झालं की मुलाविरोधात करण्यात आलेला आरोप हा खोटा होता. याबाबत मुलीनं असंही सांगितलं की, बलात्कारानंतर ती घाबरली होती आणि काहीच समजत नव्हतं. तेव्हा तिनं दहा वर्षीय मुलाचं नाव घेतलं. रशियात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. अद्याप मुलीने त्या मुलाचं नाव सांगितलं नाही ज्याने बलात्कार केला होता.