सीरियात बंडखोरांनी रशियाचे लढाऊ विमान पाडले

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

हयात ताहरीर अल-शाम ही संघटना पूर्वीच्या अल काईदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. वैमानिकाने विमानातून बाहेर आल्यावर गोळीबार केला, पण बंडखोरांनी त्याला पकडून हत्या केली, अशा माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली

इस्तंबूल- हयात ताहरीर अल-शाम या दहशतवादी संघटनेने रशियाचे सुखोई-25 हे लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

विमान पाडण्यात आलेल्या भागावर बंडखोरांचे वर्चस्व आहे. रशियाच्या शक्तिशाली हवाई दलाचा पाठिंबा मिळाल्याने सीरियातील बाशर अल असद यांच्या सरकारने इडलिब येथील बंडखोरांबिरोधात डिसेंबर महिन्यात मोठी मोहिम उघडली होती.

हयात ताहरीर अल-शाम ही संघटना पूर्वीच्या अल काईदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. वैमानिकाने विमानातून बाहेर आल्यावर गोळीबार केला, पण बंडखोरांनी त्याला पकडून हत्या केली, अशा माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

Web Title: Russian jet shot down in Syria's Idlib province