रशियन मॉडेलचे पायच आहेत चार फूट; उंची पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 7 October 2020

एका रशियन मॉडेलने सर्वात लांब पायांसाठी एक नवा गिनीज विश्वविक्रम (Guinness world record) नोंदवला आहे. तिच्या पायाची लांबी तब्बल 132 सेंटीमीटरहून अधिक भरली आहे.

मॉस्को: एका रशियन मॉडेलने सर्वात लांब पायांसाठी एक नवा गिनीज विश्वविक्रम (Guinness world record) नोंदवला आहे. तिच्या पायाची लांबी तब्बल 132 सेंटीमीटरहून अधिक भरली आहे. एकतेरिना लिसिना (Ekaterina Lisina) या 29 वर्षीय तरुणीची उंची 6 फूट 8.77 इंच आहे. लिसिनाने सर्वात उंच महिला व्यावसायिक मॉडेलचा असल्याचा गिनीज रेकॉर्ड मोडला आहे. तिचा डाव्या पायाची लांबी 132.8 भरली असून उजव्या पायची लांबी 132.2 सेंटीमीटर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लिसिनाची उंची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोजण्यात आली आहे.

लिसिना तिच्या उंचीबद्दल सांगितलं की, शाळेत मला उंचीवरून नेहमी चिडवलं जायचं'. याबद्दल अशा मुलींमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी काम करण्याची लिसिनाने इच्छाही व्यक्त केली आहे. लिसिनाला तिच्या मापाच्या पॅंट मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात तसेच तिला विमान आणि गाडीतून प्रवास करताना खूप अवघडल्यासारखं वाटतं, असं तिने सांगितलं आहे. लिसिनाच्या बूटाची साईज 47 असल्याने तिला त्यातही खूप अडचणी येत असतात.

Ekaterina Lisina taller 2 by lowerrider on DeviantArt

मी तयारच आहे मात्र ट्रम्प कोरोनाग्रस्त असताना दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट नको -...

जगातील सर्वात लांब पाय असण्याचे काही फायदेही लिसिनाने सांगितले. जास्तीच्या उंचीमुळे तिला बास्केटबॉल खेळात करियर करण्यात मदत मिळाली. महत्वाचे म्हणजे 2008 च्या बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने रशियाकडून ब्राँझपदकही जिंकलं होतं.

 

Ekaterina Lisina, the world's tallest professional model : pics

ट्रम्प यांना फेसबुक-ट्विटरचा दणका; कोरोनाला हलक्यात घेण्याची केली चूक

खेळात चांगली गती असूनही लिसिनाला नेहमीच मॉडेल होण्याची इच्छा असल्याने तिने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बास्केटबॉल खेळणं सोडून दिलं. लिसिना मागील एक वर्षाहून अधिक काळ व्यावसायिक मॉडेल म्हणून काम करत आहे. जगातील सर्वात लांब पायांचा विक्रम यापूर्वी रशियाच्याच स्वेतलाना पंक्रातोव्हाच्या (Svetlana Pankratova) नावावर होता. स्वेतलानाचे पाय लिसिनापेक्षा किंचित लहान 132 सेंटीमीटर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian model breaks world longest leg Guinness record