कट्टर विरोधकावर विषप्रयोग; पुतीन यांनी सोडलं मौन

vladimir putin reaction on navalny poisoning
vladimir putin reaction on navalny poisoning

मॉस्को - रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी (alexei navalny) यांच्यावर विषप्रयोग झाला होता. याचा आरोप पुतीन यांच्यावरच केला जात होता. यावर पहिल्यांदाच पुतीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं की, नवाल्नी यांच्या पत्नीने विनंती करताच नवाल्नी यांच्यावर परदेशात उपचारासाठी काय करता येईल याची चौकशी करण्यास सांगितलं. काही प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असल्यानं परदेश प्रवासावर बंधने होती. नवाल्नी यांना रशियातून बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. 

प्रमुख विरोधक अलेक्सी नवाल्नी यांना झालेल्या विषप्रयोगात सरकारचा हात असल्याचा आरोप अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आज फेटाळून लावला. उलट, जर्मनीमध्ये उपचारांसाठी जाण्यास मी स्वत:च परवानगी दिल्याचा दावा पुतीन यांनी केला. नवाल्नी यांना २० ऑगस्टला विमान प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता विषप्रयोग झाल्याचे आढळून आले होते. हा विषप्रयोग पुतीन यांनीच करवून आणल्याचा दावा आरोप होत आहे. मात्र, आपणच नवाल्नी यांना उपचारांसाठी देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली. सरकारने विषप्रयोग केला असता तर अशी परवानगी मिळालीच नसती. 

नवाल्नी हे विमान प्रवास करत असताना अचानक अस्वस्थ झाले होते. त्यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणीमध्ये नवाल्नी यांना नोविचोक नावाचं विष दिल्याचं समोर आलं होतं. यानंतर सातत्याने विरोधकांनी पुतीन यांच्यावर आरोप केले होते. 

नवाल्नी अस्वस्थ झाल्यानंतर दोन दिवस कोमामध्ये होते. त्यांच्यावर ओम्स्क शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर बर्लिनला नेण्याआधी रशियन डॉक्टरांनी नवाल्नी यांच्या शरीरात विष आढळलं नव्हतं असं सांगितलं होतं. नवाल्नी यांनीही पुतीन यांच्यावर आरोप करत विषप्रयोगामागे पुतीन यांचा हात असल्याचं म्हटलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com