पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगाची शस्त्रक्रिया

पंतप्रधानांऐवजी ‘एफएसबी’च्या माजी प्रमुखांकडे सत्तेची सूत्रे
Russian President Vladimir Putin soon undergo cancer surgery
Russian President Vladimir Putin soon undergo cancer surgerySakal

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगावरील शस्त्रक्रिया होणार आहे. या दरम्यान देशाची धुरा ‘द फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे (एफएसबी) माजी प्रमुख निकोलाय पॅत्रुशेव्ह (वय ७०) हे सांभाळणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची तात्पुरती कमानही त्यांच्याकडेच राहणार आहे, अशी माहिती क्रेमलिनमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘डेली मेल’ने दिले आहे.

पेत्रुशेव्ह हे पुतीन यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जातात. युक्रेनवरील हल्ल्याच्या रणनीतीचे ते प्रमुख शिल्पकार मानले जातात. किव्हमध्ये नव-नाझीवाद्यांचे प्राबल्य वाढले असून ते रशियाच्याविरुद्ध सतत षड्‍यंत्र रचत असल्याचे त्यांनीच पुतीन यांच्या मनात भरविले होते. पुतीन यांच्यावरील कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा दावा प्रसिद्ध टेलिग्राम वाहिनी ‘जनरल एसव्हीआर’ने केला आहे. ही माहिती ज्यांच्याकडून मिळाले, ती क्रेमलिनमधील उच्चपदस्थ व्यक्ती असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

‘‘शस्त्रक्रियेनंतर पुतीन पुन्हा कधी सक्रिय होतील हे मी सांगू शकत नाही. पण खूप कमी कालावधीत ते पुन्हा कार्यरत होतील,’’ असे या सूत्राने सांगितल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे. सत्तेची सूत्रे दुसऱ्याकडे सोपविण्यास पुतीन आधी राजी नव्हती. पण नंतर ते तयार झाले असून पुतीन यांच्या शस्त्रक्रिया काळात दोन किंवा तीन दिवस देशाची जबाबदारी पेत्रुशेव्ह यांच्याकडे असेल, असे सांगण्यात आले आहे.

रशियाच्या घटनेनुसार घटनात्मक पेचात देशाचे सूत्रे पंतप्रधानांकडे सोपविणे आवश्‍यक असते. पण तसे न होता यासाठी पेत्रुशेव्ह यांची निवड धक्कादायक समजली जात आहे. पुतीन यांना गेल्या १८ वर्षांपासून पोटाच्या कर्करोगाने आणि कंपवाताचा त्रास आहे, असे ‘जनरल एसव्हीआर’ने म्हटले आहे.

शस्त्रक्रिया ९ मेनंतर होणार?

रेड स्वेअर येथे ९ मे रोजी होणाऱ्या विजय दिनानंतर (दुसऱ्या जागतिक युद्धातील रशियाने मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ साजरा होणारा दिवस) पुतीन यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत. आधी ही शस्त्रक्रिया एप्रिलच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये होणार होती. पुतीन हे वैद्यकीयदृष्ट्या समस्या असल्याची बाब क्रेमलिनकडून फेटाळली असून ते त्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात येत असल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com