अमेरिकेच्या ऍटर्नी जनरलची ट्रम्प यांच्याकडून हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

"प्रवेशबंदी'स विरोध केल्याने कारवाई

वॉशिंग्टन- मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत "प्रवेशबंदी'चा आदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात दिला. पण, हा आदेश अमलात न आणण्याची सूचना विधी व कायदा विभागाला देणाऱ्या अमेरिकेच्या हंगामी ऍटर्नी जनरल सॅली येट्‌स यांची ट्रम्प यांनी हकालपट्टी केली. हंगामी स्थलांतर व सीमाशुल्क विभागाच्या अंमलबजावणी खात्याचे डॅनियल रग्सडेल यांचीही उचलबांगडी करून ट्रम्प यांनी थॉमस डी. होमन यांची नियुक्ती केली आहे.

अमेरिकेच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ट्रम्प यांनी "प्रवेशबंदी'चा आदेश दिला आहे. तो अमलात आणण्यास मनाई करून येट्‌स यांनी न्याय विभागाचा विश्‍वासघात केला आहे, असे व्हाइट हाउसने सोमवारी (ता.30) रात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी येट्‌स यांची नियुक्ती ऍटर्नी जनरल या पदावर केली होती. बेकायदा स्थलांतर व सीमेवरील प्रश्‍नांबाबत येट्‌स यांचे ज्ञान अपुरे आहे, असे नमूद करून या आदेशाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणे व आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या कामावर प्रश्‍न उपस्थित करण्यावरून ओबामा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, असे यावरून दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

"धर्मावर आधारित भेद नको'
"देशाची मूल्ये पणाला लागली असतील, तर आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या कारभारावर आपण भाष्य करू,' असे ओबामा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी सांगितले होते. ओबामा प्रशासनाच्या धोरणाचा एक भाग म्हणून सात देशांना अमेरिकेत "प्रवेशबंदी'ची निर्णय घेतल्याचे सांगून ट्रम्प यांनी आज पुन्हा आपल्या कृतीचे समर्थन केले. त्यानंतर ओबामा यांच्याकडून ट्रम्प यांच्या निर्णयावर मत व्यक्त करण्यात आले. ओबामा प्रशासनातील परराष्ट्र धोरणाची तुलना ट्रम्प यांच्या या निर्णयाशी केली असली तरी धर्म व श्रद्धेच्या आधारावर भेदभाव करणे ओबामा यांना कधीही मंजूर नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांच्या प्रवक्‍त्यांनी केले.

Web Title: Sally Yates fired by Trump after acting US attorney general defied