जगातील सर्वात तरुण पंतप्रधान पाहिल्या का? 

वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

  • साना मरिन ठरल्या जगातील तरुण पंतप्रधान
  • केवळ 34 व्या वर्षी फिनलंडची सूत्रे हाती

हेलसिंकी (फिनलंड) : फिनलंडच्या पंतप्रधानपदी साना मरिन (वय 34) यांची निवड झाली आहे. त्या देशाच्या इतिहासातील व जगातीलही सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत. फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने (एसडीपी) रविवारी (ता.8) रात्री उशिरा मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली. या आधी त्या परिवहनमंत्री होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

मरिन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. माजी पंतप्रधान ऍन्टी रिने यांनी 3 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल नव्या पंतप्रधानांची निवड झाली. यासाठी "एसडीपी'कडून साना मरिन आणि अँटी लिंडमन असे दोन उमेदवार होते. यात मरिन यांना 32, तर लिंडमन यांना 29 मते मिळाली.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

"सेंटर पार्टी' पक्षाचे नेते इस्को अहओ हे 1991 फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्या वेळी ते 36 वर्षांचे होते. मरिन या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. जगातील सर्वांत कमी युक्रेनचे 35 वर्षांचे पंतप्रधान ओलेस्की हॉंचारुक हे जगातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 21 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारले होते. आता साना मरिन या जगातील सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

Image result for sana marine created history finlands youngest prime minister World"

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

सर्वोच्च स्थान भूषविणारे जगातील सर्वांत तरुण नेते व त्यांचे वय (वयानुसार क्रमवारी)
1) साना मरिन (फिनलंड) : 32 वर्षे 23 दिवस
2) ओलेस्की हॉंचारुक (युक्रेन) : 35 वर्षे 155 दिवस
3) किम जोंग उन (उत्तर कोरिया) : 36 वर्षे 335 दिवस
4) नायिब बुकेले (एल साल्वाडोर) : 38 वर्षे 138 दिवस
5) जॅसिंडा अर्डेरन (न्यूझीलंड) : 39 वर्षे 136 दिवस
6) फ्रिट्‌स विल्यम मायकेल (हैती) : 39 वर्षे 139 दिवस
7) तामिम बिन हमाद अल थानी (कतार) : 39 वर्षे 189 दिवस
8) जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (भूतान) : 39 वर्षे 291 दिवस
9) कार्लोस अल्वारॅडो क्‍युसेडा (कोस्टारिका) : 39 वर्षे 329 दिवस
9) झेवियर एस्पॉट झामोरा (अँडोरा) : 40 वर्षे 40 दिवस

Image result for sana marin created history finland youngest prime minister World"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sana marine created history finlands youngest prime minister World

टॅग्स