गुगल-वॉलमार्ट यांची ई-कॉमर्समध्ये भागीदारी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल

सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत.

वॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतील. गुगल असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांना या उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करता येईल. सध्याही वॉलमार्टची काही प्रमाणात उत्पादने गुगलवरून खरेदी करता येत असून, यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने गुगलशी भागीदारी केली आहे. वॉलमार्टच्या ऍमेझॉनशी ई-कॉमर्समध्ये मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. वॉलमार्ट आता व्होल मार्केट ही सुपरमार्केट साखळी ताब्यात घेण्याच्या टप्प्यात आहे. तिसऱ्या तिमाहीत वॉलमार्ट निकाल चांगले लागले असले, तरी कंपनी ऍमेझॉनच्या पाठीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगलही ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात गुगल होम ब्रॅंडच्या माध्यमातून विस्तार करत आहे.

Web Title: sanfrancisco news google walmart and e commerce