अमेरिकेत काहीही होऊ शकते; मतदान करा म्हणून सेलिब्रेटींचे ''नग्न'' आवाहन

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवल्या जातात. जेणेकरुन मतदारांनी मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडावे हा उद्देश त्यामागे आहे. अमेरिकेतील काही सेलिब्रेटींनी चक्क ''नग्न'' होऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे.

US Election-अमेरिका म्हटल्यावर डोळ्यासमोर उभे राहते ती म्हणजे, श्रींमंती, पैसा, झगमगाट, आता तर भारतातल्या बहुतांशी तरुणांना अमेरिकेत जाऊन रग्गड पैसा कमविण्याची इच्छा आहे. सध्या तिथे निवडणूकीचे वारे वाहत असल्याने वातावरण पूर्णपणे भारावून गेलेले पाहावयास मिळत आहे. तुम्हाला काय वाटलं मतदारांनी मतदान करावे असे आवाहन काय फक्त भारतातच केले जात नाही. अमेरिकेतील मतदानाची गोष्ट आपल्यापेक्षा फार वेगळी नाही. 

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवल्या जातात. जेणेकरुन मतदारांनी मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडावे हा उद्देश त्यामागे असतो. अमेरिकेतील काही सेलिब्रेटींनी चक्क ''नग्न'' होऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे. अमेरिकेतील डेली मेल या दैनिकाने यासंबंधीचे अधिक माहिती देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. त्या आवाहनामध्ये सारा सिल्व्हरमन, मार्क रफेलो, ख्रिस रॉक, टिफनी हॅडिश, अमी शुमर यांच्यासह अनेकजण यात सहभागी झाले आहेत.

या मोहिमेत सहभागी झालेल्या कलाकारांनी ''नग्न'' स्वरुपातील छायाचित्रे आपल्या सोशत अकाऊंटवर प्रसिध्द करुन नागरिकांचे लक्ष वेधले आहे. नागरिकांनो आता घराबाहेर पडण्याची वेळ आली असून सर्वांनी मतदान करा. असा संदेश त्यांनी दिला आहे. चेल्सा हँडलर, जोश गड. केरी वॉशिंग्टन, नाओमी कॅम्बेल यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले आहे. ''अमेरिकेला तुमची गरज आहे'' हा त्यातील एक महत्वाचा संदेश त्यातून देण्यात आला आहे. 

पुढच्या महिन्यातील मंगळवारी (3 नोव्हेंबर 2020) रोजी देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणचे नियम, निवडणूकांच्या वेळा वेगळ्या आहेत. या कलाकारांनी पेनसिल्वियातील नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarah Silverman Mark Ruffalo Chris Rock and more get NAKED as they encourage people to vote