अस्थिरतेमुळे भयावह परिणामांचा धोकाः पाक

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद- प्रादेशिक स्थिरतेसाठी विश्वासार्ह कमीत कमी शक्तिसंतुलन कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत आज (मंगळवार)  पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आले. तसेच, प्रादेशिक अस्थिरतेचे भयावह परिणाम भोगावे लागतील, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले, की भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रादेशिक स्थिरता टिकविण्यास मोठे महत्त्व असून, कमीत कमी आणि विश्वासार्ह अण्विक शक्तिसंतुलन कायम राखण्याचे पाकिस्तानचे धोरण आहे. प्रादेशिक स्थिरतेचे आगामी काळात भयावह परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अझीझ यांनी दिला.

Web Title: Sartaj Aziz is a Pakistani strategist's statement