esakal | स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली 'मिठी मारणारी जोडपी'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

स्वीडनमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी सोन्याच्या दोन डझन फॉइलचा शोध लावला असून यात त्यांना अनेक रहस्यमय गोष्टी सापडल्याचा उल्लेख केला आहे.

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली 'मिठी मारणारी जोडपी'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : सुमारे 1300 वर्षांपूर्वी स्वीडनमधील 'अस्का' या जागेवर मानवनिर्मित रचना असलेल्या एका सभागृहातील मोठ्या हॉलमध्ये प्राचीन अवशेष सापडले आहेत. दरम्यान, संशोधक अद्याप त्याच्याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तुटलेल्या अवशेषाची आकडेवारी एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आमच्या अंदाजानुसार, आम्हाला सध्या 22 सोन्याच्या फॉइल (Gold Foil) सापडल्या असून अद्याप आणखी शोधकार्य सुरु आहे. अजूनही या फॉइल नेमक्या किती आहेत, याचा अंदाज देता येत नसल्याने त्याची संख्याही स्पष्टपणे सांगता येत नाही. कारण, सोन्याच्या या प्राचीन वस्तूचे बहुतेक तुकडे झाले आहेत. त्यामुळे कोणता तुकडा कोणत्या अवयवाला जोडता येईल, याबाबत थोडी साशंकता निर्माण झाल्याचे पोलंड येथील लॉड्झ युनिव्हर्सिटीमधील पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक मार्टिन रुंडकविस्ट (Martin Rundkvist) यांनी नुकतेच academia.edu या साइटवर याची माहिती अपलोड केल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पूर्वजांनी पुनरावलोकन केलेल्या जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

चीनचे उद्योगपती झोंग आशियातील सर्वात श्रीमंत; मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

सोनाराने केला रहस्यमय गोष्टीचा उलगडा

जेव्हा हे प्राचीन अवशेष सापडले, तेव्हा बरेच तुकडे कमी-अधिक प्रमाणात इतरत्र आढळून आल्याचे एडी हर्लिन (Eddie Herlin) नावाच्या सोनाराने पुरातत्वशास्त्रज्ञांना याबाबतची माहिती सांगताना या रहस्यमय गोष्टीचा उलगडा केला, असे रंडकविस्ट यांनी लिहिले आहे. अहवालात असे दिसून आले आहे, की यातील काही अवशेषांच्या कडा मध्यभागी दुमडली असून त्या ओळखण्यास अडचणी येत आहेत. सोन्याच्या या प्राचीन गोष्टीचा उलगडा करण्यासाठी हर्लिनसारख्या तज्ञ सोनाराचा पाठिंबा आवश्यक होता, जो या अवशेषांना इजा न करता त्याचा उलगडा करणार होता आणि तो यात सक्षम देखील होता. पुरातत्वाने हे तुकडे उलगडल्यानंतर हे स्पष्ट झाले, की सोन्याच्या सर्व आकृत्यांमध्ये जोडप्यांना मिठी मारल्याचे चित्रण होते आणि त्या कोणत्यातरी कलाकृतीशी संबंधित असल्याचे संकेत देत होते.

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

'ते' जोडपे कोण?

प्राचीन अवशेषात सापडलेले हे जोडपे कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वीडनमधील इतर साइटवरती या सोन्याच्या फॉइलबाबतची माहिती पाहिली असता, याचा कोणताही नामोल्लेख यात आढळला नाही. तसेच त्याबाबत कोणतीही हयात लेखी माहिती नाही, असेही रुंडकविस्ट यांनी सांगितले.

स्वीडनमधील एका साइटवर बर्‍याच वेगवेगळ्या आकृत्या सापडतात आणि त्या वेगवेगळे निकष दर्शवितात. पूर्वी अशा प्राचीन कलाकृती काही घटनांचे संकेत देत होत्या, त्यामुळे या ही कलाकृती अविस्मरणीय रहावी यासाठी, तर जतन केली नसेल ना?, याबाबतही चर्चा होताना दिसत आहे. एक शक्यता अशी आहे, की मिठी मारणारे जोडपे म्हणजे देवी-देवता. आम्हाला माहित आहे, की त्या काळात राजे दैवी वंशाचा दावा करीत होते, असेही रुंडकविस्ट म्हणाले. तसेच लग्न करणाऱ्या राजकुमारी आणि राजकन्या यांचे देखाल हे चित्रण असू शकते, असेही रंडकविस्ट यांनी स्पष्ट केले.

स्वीडनच्या स्कॅनियाने बस करारासाठी भारतीय अधिका-यांना दिली ‘लाच’; वाहनाच्या कागदपत्रांत केला फेरफार

कोरलेल्या सोन्याच्या आकृत्यांव्यतिरिक्त पुरातत्वशास्त्रज्ञांना Whale Bone च्या हाडापासून बनविलेले खेळांचे साहित्य, तसेच तीन लोखंडी पेंडेंट सापडले आहेत. रेडिओकार्बन डेटिंग असे सूचित करते, की हॉल आणि सभागृहात A.D. 650 ते A.D. 680 च्या दरम्यान कधीतरी तयार केले गेले होते आणि पुरातत्व कार्य असे दर्शविते की, हॉल अखेरीस व्यवस्थित पद्धतीने मोडला गेला. त्यामुळे रेडिओकार्बनचे असे मत आहे की, A.D. 940 च्या आसपास घडले असावे. यात हिंसक विनाशाचे कोणतेही चिन्ह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top