सौदी अरेबियात बस अपघातात 35 पर्यटकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

या अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी परदेशी नागरिक आहेत. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पवित्र शहर असलेल्या मक्काला जोडणाऱ्या मदिना येथे हा भीषण अपघात झाला. बस आणि मालवाहू वाहनामध्ये हा अपघात झाला.  

रियाध : सौदी अरेबियातील मुस्लिम धर्मियांचे पवित्र शहर असलेल्या मदिनाजवळ बुधवारी झालेल्या भीषण बस अपघातात 35 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी परदेशी नागरिक आहेत. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पवित्र शहर असलेल्या मक्काला जोडणाऱ्या मदिना येथे हा भीषण अपघात झाला. बस आणि मालवाहू वाहनामध्ये हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधून आशियाई आणि अरब नागरिक प्रवास करत होते.  

या दोन्ही वाहनांमधील अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांना आग लागली. दरम्यान, पोलिस दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. मात्र पोलिसांना अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा अपघात मदिनापासून 170 किमी दूर असलेल्या हिजरा रोडवरील अल अखल गावाजवळ झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Arabia 35 Foreigners Dead As Bus Collides With Excavator