धक्कादायक! सौदी अरेबियात एकाच दिवसात ८१ जणांना फाशी

ज्या लोकांना फाशी देण्यात आली आहे, ते सौदी अरेबियामध्ये हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली होती.
Saudi Arabia hanged 81 people in a single day for terrorism related offences
Saudi Arabia hanged 81 people in a single day for terrorism related offencesटिम ई सकाळ

सौदी अरेबियामध्ये एकाच दिवसात ८१ लोकांना फाशी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा आकडा गेल्या वर्षभरात फाशीची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारांच्या एकूण संख्येइतका आहे. (saudi arabia executed 81 people in single day for terrorism related offences)

सौदी अरेबियाच्या एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात दुजोरा देताना म्हटले हे सर्व जण इस्लामिक स्टेट, अल-कायदा किंवा इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. सोबत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की ज्या लोकांना फाशी देण्यात आली आहे, ते सौदी अरेबियामध्ये हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली होती. यात मोठ्या संख्येने सामान्य नागरीकांची हत्या तसेच संरक्षण दलांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. एवढेच नाही तर हे दोषी लोक सरकारी कर्मचारी आणि महत्त्वाच्या आर्थिक संस्थांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते.

वृत्तसंस्था म्हणते,“सौदी अरेबियाचे सरकार दहशतवादाविरोधात कठोर निर्णय घेत राहील तसेच कट्टरपंथी विचारधारा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल.”

Saudi Arabia hanged 81 people in a single day for terrorism related offences
सोनिया-राहुल-प्रियांका गांधींचा पक्षाला रामराम? काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

ज्या ८१ लोकांना फाशी देण्यात आली आहे त्यात ७३ सौदी नागरिक, सात येमेनी आणि एक सीरियाचा नागरिक आहे.अपहरण, अत्याचार, बलात्कार, तस्करी, शस्त्रास्त्रे आणि बॉम्बस्फोट अशा गुन्ह्यांमध्ये या लोकांचा सहभाग होता. या सर्वांवर सौदी न्यायालयात खटले चालवले आणि एकूण १३ न्यायाधीशांनी या प्रकरणांची सुनावणी केली.

Saudi Arabia hanged 81 people in a single day for terrorism related offences
देवा, मला आई बदलून दे; चिमुरडीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

विविध प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात सौदी अरेबिया आघाडीवर आहेत.मात्र मानवाधिकार संघटना आणि अनेक पाश्चिमात्य देश यावरून त्यांच्यावर टीका करतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com