सौदी कोर्टाने बदलला निर्णय; 5 दोषींना आता 20-20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

वृत्तसंस्था
Tuesday, 8 September 2020

सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने सोमवारी सरकारी वकिलांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने असे सांगितले की, पाच दोषींना20वर्षांची तुरूंगवास आणि इतर तिघांना 7ते 10वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

रियाध-  जमाल खाशोगी हत्या प्रकरणातील  (Jamal Khashoggi Murder) पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेचा निकाल सौदी अरेबियातील कोर्टाने (Saudi Arabia Court) सोमवारी रद्द केला आहे. सौदी प्रेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, रियाद फौजदारी कोर्टाने आता या प्रकरणात आठ दोषींना 7 ते 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी त्यातील 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.  खाशोगी कुटुंबीयांनी मारेकऱ्यांना माफ केल्याने या 5 जणांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करुन आता त्यांना 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे.

सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने सोमवारी सरकारी वकिलांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने असे सांगितले की, पाच दोषींना 20 वर्षांची तुरूंगवास आणि इतर तिघांना 7 ते 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. या आठ दोषींची ओळख जाहीर केलेली नाही. मे महिन्यात हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी सुमारे चार महिन्यांपूर्वी खाशोगीच्या मुलाने सांगितले की त्यांनी मारेकऱ्यांना माफ केलं आहे. खाशोगी यांचा मुलगा सलाह खाशोगी यांनी ट्विट केले की, 'मी हुतात्मा जमाल खाशोगीचा मुलगा आहे. माझ्या वडिलांचा ज्यांनी खून केला त्यांना मी क्षमा केली आहे.' खशोगींच्या पत्नीने मात्र या कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला असून न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही, असं सांगितलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जमाल खाशोगी हे वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहत होते. खाशोगी सौदीतील रॉयल कुटुंबाचे मोठे टीकाकार मानले जात होते. त्यांनी एक लेखात राजे महम्मद बिन सलमानवर टीका केली होती. 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूल (तुर्की) येथील सौदी दूतावासात त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर खाशोगी यांचा मृतदेहही सापडला नव्हता. खाशोगींच्या या हत्येनंतर जगभरातून सौदी अरेबियावर टिका केली होती.  खाशोगी खून प्रकरणात 23 डिसेंबर 2019 रोजी सौदी अरेबियातील कोर्टाने पाच दोषींना फाशीची शिक्षा आणि तीन जणांना 24 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. सौदी राजकुमारचे दोन साथीदारही या हत्येमध्ये सहभागी होते, असे आरोपही होत होते.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत सौदी अरेबियाचा हात नाही असा विश्‍वास रशियाने व्यक्त केला होता. त्यानंतर खाशोगी यांच्या हत्येत सौदीचा हात नसल्याचा विश्‍वास रशियाला वाटत आहे का? असा प्रश्‍न पत्रकाराने केल्यानंतर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा प्रश्‍न अनुचित असल्याचे सांगितले होते. याबाबत सौदीचे राजे, युवराज महम्मद बिन सलमान यांनी अधिकृत विधान केले असून, त्यावर विश्‍वास न ठेवण्यासारखे काहीही नाही, असेही ते म्हणाले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi court reverses verdict, 5 convicts now imprisoned for 20-20 years