हिझाबशिवाय छायाचित्र काढल्याने सौदी महिला अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

रियाध - अत्यंत कर्मठ इस्लामी, पुरुषसत्ताक राज्यव्यवस्था असलेल्या सौदी अरेबियामध्ये "हिझाब'शिवाय काढलेले छायाचित्र प्रसिद्ध करण्याची हिंमत दाखविलेल्या एका तरुण सौदी महिलेस येथील पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. रियाधमधील मुख्य रस्त्यावर हिझाब परिधान न करता काढलेले छायाचित्र या महिलेने ट्‌विटरवर प्रसिद्ध केले होते.

संबंधित महिलेस तुरुंगामध्ये पाठविण्यात आले आहे. "कोणतेही कौटुंबिक नाते नसलेल्या पुरुषांशी असलेल्या संबंधांबद्दल ती बोलल्याचा' आरोपही पोलिसांनी तिच्याविरोधात ठेवला आहे.

"या महिलेचे वर्तन सौदी राज्यामधील नियमांचे उल्लंघन करणारे आहे. सर्व नागरिकांनी इस्लामच्या शिकवणुकीचे पालन करावे,'' असे पोलिस दलाचे प्रवक्ते फवाझ अल मैमान यांनी म्हटले आहे. या महिलेचे नाव औपचारिकरित्या प्रसिद्ध करण्यात आले नसले; तर काही संकेतस्थळांनी तिचे नाव मलक-अल-शेहरी असे असल्याचे म्हटले आहे.

अत्यंत सनातन विचारसरणी असलेल्या सौदी अरेबियामध्ये महिलांनी "अनैतिक' वर्तन करु नये, यावर येथील पोलिस दलाची करडी नजर असते. सौदी समाजामध्ये हिझाबशिवाय महिलेने बाहेर पडणे ही अत्यंत बंडखोरीची बाब मानली जाते. येथील महिलांनी घराबाहेर पडताना कपाळापासून पावलांपर्यंत वस्त्र परिधान करणे बंधनकारक आहे. महिलांना गाडी चालविण्याची मनाई करणाराही सौदी अरेबिया हा जगामधील एकमेव देश आहे.

Web Title: Saudi police arrest woman for posting photo without veil