जगातील तब्बल एवढी झाडे होणार नामशेष; शास्त्रज्ञांचा इशारा

Tree
Tree

न्यूयॉर्क - पृथ्वीवरचे जैववैविध्य, हिरवीगार जंगले याचे जतन करण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत असले तरी हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. याचाच परिणाम म्हणजे जगातील दोन पंचमांश वृक्षवल्ली नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झाडांची क्षमता
किव येथील ‘रॉयल बोटॅनिक गार्डन्स’ ने केलेल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. ‘स्टेस ऑफ द वर्ल्डस प्लँट अँड फंगी’ हा विश्‍लेषणात्मक अभ्यास, ४२ देशांमधील २०० शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. जैववैविध्याचा नाशावर जगातील नेत्यांकडून उपाययोजना जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत हा अहवाल सादर करण्यात आला. झाडांच्या नव्या प्रजाती नामशेष होण्यापूर्वी त्यांचे नामकरण करून माहिती नोंदविण्याचे काम युद्धपातळीवर करीत असल्याचे संशोधकांनी सांगितले. औषधे, इंधन, अन्न पुरविण्याची प्रचंड क्षमता झाडांमध्ये आहे. मात्र अन्न सुरक्षा आणि हवामान बदलासारख्या वैश्‍विक समस्‍यांवर वनस्पती व बुरशीचा वापर करण्याची संधी आपण गमावत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अस्त युगाचा धोका   
‘आपण सध्या अस्त युगात जगत आहोत. हे जोखमीचे व चिंताजनक चित्र आहे. यासाठी तातडीने कृती करण्याची गरज आहे,’’ असे किव येथील विज्ञान विभागाचे संचालक प्रा. अलेक्झांड्रे अँटोनेली म्हणाले. वेळेविरुद्धची शर्यत आपण हरत आहोत. कारण आपण झाडांच्या प्रजाती शोधून त्यांना नावे देण्यापूर्वीच त्या नष्ट होण्याचा धोका वेगाने वाढला आहे. औषधांसारख्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. अगदी सध्याच्या महासाथीवरही ते उपयुक्त ठरु शकतात, असे ते म्हणाले.

अहवालातील नोंद...

  • अन्न व जैवइंधनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वनस्पतींचा कमी प्रमाणात वापर.
  • सात हजार खाद्य वनस्पती भविष्यातील संभाव्य पीक म्हणून उपयुक्त ठरू शकतात.
  • जगातील वाढत्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी सध्या वनस्पतींचा तुरळक उपयोग.
  • लाखो लोकांनी ऊर्जा पुरविण्याची अडीच हजार झाडांची क्षमता.
  • जैवइंधनासाठी सध्या केवळ ऊस, मका, सोयाबीन, पाम तेल, तेलबिया, गहू आदी पिकांचाच उपयोग.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com